बीड जिल्ह्यात ३४ मतदान केंद्रांवर १० हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क
मराठवाडा शिक्षक - मतदारसंघात आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे मतदारांच्या नजरा..!
=======================
बीड (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
उद्या सोमवार, दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी मराठवाडा शिक्षक - मतदारसंघासाठी मतदान होत असून बीड जिल्ह्यामध्ये मतदान करण्यासाठी ३४ मतदान केंद्र प्रशासनाने तयार केले असून यावर ९ हजार ७०३ शिक्षक हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने पुर्ण तयारी केली असून कालच या मतदान केंद्रावर रवाना होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कर्मचार्यांना बॅलेट पेपरचे वाटप करण्यात आलेले आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी हे मतदान बॅलेट पेपरवर शिक्षकांनी पसंती क्रमांक देऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवावयाचा आहे. मतदान केंद्रप्रमुख ४९ मतदान केंद्र अध्यक्ष ४९, मतदान अधिकारी ४९ अशा पद्धतीने कर्मचार्यांची नियुक्ती उपनिवडणूक मतदान अधिकारी संतोष राऊत यांनी केलेली आहे. सोमवारी सकाळी हे मतदान ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. या मतदान प्रक्रियेवर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, बीड जिल्ह्याचे सहायक निवडणूक मतदान अधिकारी राधाबिनोद शर्मा हे लक्ष ठेवून असून मतदान प्रक्रियेची पुर्ण तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे.
=======================
Comments
Post a Comment