"मी वडार महाराष्ट्राचा संघटने"च्या अंबाजोगाई शहराध्यक्षपदी प्रताप देवकर यांची निवड



शहराध्यक्ष प्रताप देवकर यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन..!

=======================

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) 

"मी वडार महाराष्ट्र" या संघटनेची बीड येथे नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक "मी वडार महाराष्ट्राचा संघटने"चे संस्थापक अध्यक्ष विजयदादा चौगुले साहेब यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सुनिल गायकवाड यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. प्रताप देवकर यांच्या निवडीचे वडार समाज, मिञ परीवार आणि सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.



यावेळी बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून वडार समाजातील प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर तसेच जिल्हा आणि तालुका पातळीवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन कार्य करणारे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळेस नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या, त्यात अंबाजोगाई शहराध्यक्ष म्हणून प्रताप देवकर यांची निवड "मी वडार महाराष्ट्राचा या संघटने"चे बीड जिल्हाध्यक्ष मा.सुनिल गायकवाड (बीड) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. प्रताप देवकर यांना घरातूनच वडील गुलाबराव देवकर यांच्याकडून समाजकारण व राजकारणाचे धडे मिळाले आहेत, त्यांना राजकीय वारसा आहे. देवकर यांनी यापूर्वी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अंबाजोगाईकरांना पाणपोईची सुविधा उपलब्ध करून दिली होती, तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून वृक्षारोपण केले आहे, आणि हनुमान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यासोबतच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन केले होते. कोविड काळात देवकर यांनी सामाजिक बांधिलकीतून अंबाजोगाई शहरातील  गांधीनगर, गुरूवार पेठ भागात स्वतः सॅनिटायझर फवारणी केली होती. प्रताप देवकर यांनी निराधार व्यक्तींना शासकीय योजनेतून मानधन मिळवून दिले, अनेक कुटुंबांना रेशनकार्ड देऊन, नवमतदार यांची मतदान यादीत नांव नोंदणी केली  असे विविध लोकहिताची कामे केली आहेत व आज ही करीतच आहेत. आपल्या निवडीबद्दल नवनिर्वाचित शहराध्यक्ष प्रताप गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, वडार हृदयसम्राट, संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री विजयदादा चौगुले साहेब यांच्या आदेशाने आणि आमचे जिल्हाप्रमुख मा.सुनिलभाऊ गायकवाड यांनी माझी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या अंबाजोगाई शहराध्यक्षपदी निवड केली व नियुक्तीपत्र दिले. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. यावेळी राहुल मुंडे, शरद पवार, नितीन धोत्रे, साईराज देवकर, अमोल गायकवाड, दिनेश गायकवाड, नितीन शेळके, प्रकाश चव्हाण, उमेश पवार, शैलेश चव्हाण, अमोल देवकर, सुरज पवार, राजू मुंडे, अभिमन्यू देवकर, शाहू वाडेकर, संतोष पवार, रोहित देवकर, धनंजय देवकर, किशोर शिंदे, उमेश पवार, पवन पवार, राहूल देवकर, आकाश पवार, अजय देवकर, अतुल देवकर, सचिन मुदाळे, बाळासाहेब गुंजाळ, बाबा गुंजाळ आदींसह मोठ्या संख्येत अंबाजोगाई तालुक्यातून संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



सर्वांना सोबत घेवून वडार समाजाच्या सर्वांगीण विकासाकरीता प्रयत्न करणार : प्रताप देवकर 


आपल्या निवडीविषयी बोलताना नवनिर्वाचित अंबाजोगाई शहराध्यक्ष प्रताप देवकर म्हणाले की, मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचा एक शहराध्यक्ष या नात्याने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयदादा चौगुले साहेब, बीड जिल्हाध्यक्ष सुनिल गायकवाड यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनानुसार संघटनेची ध्येय धोरणे, संघटना मजबूत करणे आणि संघटनेचे विचार सर्व समाजातील घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीन आणि थोड्याच दिवसांत संघटनेची अंबाजोगाई शहराची कार्यकारिणी देखील जाहिर करणार असून सर्वांना सोबत घेवून यापुढील काळात वडार समाजाच्या सर्वांगीण विकासाकरीता प्रयत्न करणार असल्याचे शहराध्यक्ष प्रताप देवकर यांनी यावेळेस सांगितले.


▫️▫️▫️

=======================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)