29 जानेवारी रोजी अंबाजोगाईत मराठा समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय महामेळावा
महामेळाव्यास मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
- संयोजक भरत काका पतंगे यांचे आवाहन
========================
अंबाजोगाई (रणजित डांगे- लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) मराठा समाजातील वधु-वर पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन रविवार, दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता लोकनेते विलासराव देशमुख सभागृह, नगरपरिषद ऑफिस काॅम्लेक्स, परळी रोड, अंबाजोगाई (जि.बीड) या ठिकाणी करण्यात आले आहे. या महामेळाव्याचे उदघाटन अंबाजोगाई पीपल्स को - ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांच्या हस्ते होईल तर या महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या महामेळाव्यास मराठा समाजातील इच्छुक वधू - वर व त्यांच्या पालकांनी तसेच मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक भरत पतंगे यांनी केले आहे.
अंबाजोगाईतील छत्रपती राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्था, संचलित रेशिमगाठी मराठा वधु - वर सुचक केंद्रामार्फत रविवार, दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता लोकनेते विलासराव देशमुख सभागृह, नगरपरिषद ऑफिस काॅम्लेक्स, परळी रोड, अंबाजोगाई (जि.बीड) या ठिकाणी मराठा समाजातील इच्छुक वधू-वर व पालकांचा परिचय महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. महामेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, माजी आमदार पृथ्विराज साठे, चंद्रकांत शेजूळ (संस्थापक अध्यक्ष, तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को - ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव), माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे (धाराशिव), डॉ.प्रल्हाद गुरव (संचालक : योगेश्वरी मॅटर्निटी होम, अंबाजोगाई.), सामाजिक कार्यकर्त्या एॅड.शोभाताई लोमटे, प्रा.अरूंधती पाटील (समन्वयक, मनस्विनी महिला प्रकल्प,अंबाजोगाई.) या मान्यवरांसह इतरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या महामेळाव्यात नियोजित वधु-वर यांचा परिचय, पालकांची ओळख व वधु-वर यांच्या परिचय पञाचे (बायोडाटा) अदान - प्रदान व परिचय होईल. महामेळावा आयोजनाची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. महामेळाव्याच्या आयोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. रेशिमगाठी मराठा वधू - वर सुचक केंद्र, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन, सकल मराठा समाज बांधव, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे महामेळाव्याच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेत आहेत. राज्यस्तरीय मराठा समाजातील वधू वर व पालक परिचय महामेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रेशिमगाठी मराठा वधू-वर सुचक केंद्राचे भरतराव पतंगे (अध्यक्ष), अरूणराव काळे (उपाध्यक्ष), गणेश पतंगे (सचिव), रघुनाथराव जगताप (सहसचिव), दत्तात्रय कदम (कोषाध्यक्ष), सदाशिवराव सोनवणे (सदस्य), रामकिशन बडे (सदस्य) आदींनी केले आहे.
▫️▫️▫️
=======================
Comments
Post a Comment