मुंबई येथील राज्यव्यापी लिंगायत महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- विभागीय अध्यक्ष विनोद पोखरकर यांचे आवाहन
मुंबई येथे रविवार, दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी आझाद मैदान, मुंबई येथे सकाळी 11 वाजता राज्यव्यापी लिंगायत महामोर्चाचे आयोजन
========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
"आम्ही लिंगायत,आमचा धर्म लिंगायत" हे ब्रीद घेऊन आणि "एक लिंगायत लाख लिंगायत" हा नारा देवून रविवार, दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी आझाद मैदान, मुंबई येथे सकाळी 11 वाजता राज्यव्यापी लिंगायत महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चात मराठवाड्यातून लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावी असे आवाहन बसव ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी केले आहे.
बसव ब्रिगेडच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार रविवार, दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यव्यापी लिंगायत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चात बसव ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष अविनाश भाऊ भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहे. या महामोर्चात लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता द्या, राज्यातील लिंगायत धर्मियांना, धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करा, लिंगायत युवकांच्या विकासासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, मंगळवेढा येथील मंजूर असलेल्या महात्मा बसवण्णांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरू करा आणि विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा उभा करा या पाच प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. तरी या राज्यव्यापी महामोर्चात मराठवाड्यातील लिंगायत समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे तसेच अंबाजोगाई शहर व तालुक्यातून ज्या लिंगायत समाज बांधवांना मुंबई येथील महामोर्चात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बसव ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष विनोद सिद्राम आप्पा पोखरकर यांनी केले आहे. राज्यव्यापी महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत विभागीय अध्यक्ष पोखरकर हे बोलत होते. या बैठकीस लिंगायत समाजातील ज्येष्ठ मंडळी, विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर तसेच युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
=======================
Comments
Post a Comment