खोलेश्वर जिनियसच्या स्नेहसंमेलनातून राष्ट्रीय एकतेचे प्रतीक
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर जीनियस सीबीएसई स्कूल,अंबाजोगाईचे स्नेहसंमेलन
========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) खोलेश्वर जीनियस सीबीएसई स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रामध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रसाद कुलकर्णी व डॉ. अपर्णा कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री .खोलेश्वर शैक्षणिक संकूल चे अध्यक्ष विजयजी वालवडकर होते. तसेच खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे कार्यवाह बिपीनजी क्षीरसागर, खोलेश्वर जिनियस सी.बी.एस.ई स्कूलचे अध्यक्ष अॅड.मकरंद पत्की, कार्यवाह किरण कोदरकर, उपाध्यक्ष गोपाळरव चौसाळकर, अर्थ समिती अध्यक्ष धर्मराज बिरगड, खोलेश्वर महाविद्यालय शालेय समिती सदस्य भिमसिंग शिंदे व शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा शिंदे यांची उपस्थिती होती. डॉ.प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माझा भरभक्कम पाया हा याच शाळेने घडविला आहे. हा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला व डाॅ.अपर्णा कुलकर्णी विद्यार्थी संस्कारक्षम घडविणारीही ही पहिली
सी.बी.एस.ई शाळाआहे.असे सांगितले. पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांच्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यासाठी पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात लाभली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक बालासाहेब जगताप यांनी केले व उपस्थितांचे आभार सहशिक्षिका सौ.वैशाली पुसकर यांनी मानले. दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन हे दुपारी 4:30 वा करण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.खोलेश्वर शैक्षणिक संकूलचे कार्यवाह बिपिनदादा क्षीरसागर उपस्थित होते व प्रमुख पाहुणे म्हणून सौ.मनिषा वैद्य उपस्थित होत्या. तसेच भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्रजी आलूरकर, खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष विजयजी वालवडकर, कार्यकारणी सदस्या डाॅ.कल्पनाताई चौसाळकर, सौ.वर्षाताई मुंडे, किरण सरदेशमुख, जिनियस सी.बी.एस.ई स्कूलचे अध्यक्ष अॅड.मकरंद पत्की सर,उपाध्यक्ष डाॅ गोपाळराव चौसाळकर, कार्यवाह किरण कोदरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा शिंदे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनातून भारतीय संस्कृतीची जोपासना, विद्यार्थ्यांसोबत एकता पटवून देऊन पालकांनाही मार्गदर्शन केले.सर्व विद्यार्थ्यांनी सादरीकरणात विविधतेत एकता बिंबविण्यासाठी विविध राज्याची जसे महाराष्ट्र, बंगाल, गुजरात, हरियाणा पंजाब, केरळ, गोवा, राजस्थान या प्रदेशातील वेशभूषा करून उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण केले यात सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. व पालक वर्ग ही उस्फूर्तपणे सहभागी झाला होता. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे शाळेच्या विद्यार्थीनी कु.श्रेया शिंदे व कु.शांभवी खडके यांनी केले आणि उपस्थितांचे आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा शिंदे यांनी मानले.
======================
Comments
Post a Comment