मुख्याध्यापक श्री.निवृत्तीराव दराडे यांच्या सेवागौरव सोहळ्याचे मंगळवारी अंबाजोगाईत आयोजन
सेवागौरव सोहळ्यास मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
=======================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) (प्रतिनिधी)
येथील श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री.निवृत्ती दराडे हे प्रदीर्घ सेवेनंतर मंगळवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील सेवेचा यथोचित गौरव मंगळवार, दि.३१ जानेवारी रोजी सायं.४.३० वाजता श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये होणार आहे.
विद्यार्थीप्रिय तसेच अत्यंत तळमळीने हजारो विद्यार्थी घडवणारे, गणित व इंग्रजी या अवघड वाटणाऱ्या विषयांना अत्यंत सहजतेने विद्यार्थ्यांच्या गळी उतरवणारे हाडाचे शिक्षक असणारे श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक निवृत्तीराव दराडे सर हे शासकीय नियत वयोमानानुसार मंगळवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवेचा यथोचित गौरव होणार आहे. या सेवागौरव सोहळ्यासाठी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी तथा स्थानिक समन्वय समितीचे पदाधिकारी शालेय समितीचे पदाधिकारी, सामाजातील प्रतिष्ठीत नागरिक, कार्यकर्ते, सर्व शिक्षक बंधू, भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
=======================
Comments
Post a Comment