मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने 4 फेब्रुवारी रोजी जेष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान होणार



तर स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी जगदीश शिंदे, नृसिंह सूर्यवंशी व प्रा.बिभीषण चाटे यांची निवड

========================

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाईच्या वतीने दर्पण दिन व मूकनायक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या स्व.नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी नृसिंह सूर्यवंशी, स्व.मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी जगदीश शिंदे, स्व.दत्ताआबा शिंदे आपेगावकर यांच्या स्मृतीनिमित्त घोषित करण्यात आलेल्या पुरस्कारासाठी प्रा.बिभीषण चाटे यांची निवड करण्यात आली असुन 4 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या गडकिल्ले संवर्धन समितीचे सदस्य व व्याख्याते संकेत कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात जेष्ठ पत्रकार तथा अंबाजोगाईचे भूमीपुत्र जगदीश पिंगळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.


मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, राज्य प्रसिद्धीप्रमुख अनिल महाजन, बीड जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 4 वर्षांपासून परिषदेच्या अंबाजोगाई शाखेचे उल्लेखनीय काम सुरू असुन यावर्षी 4 फेब्रुवारी रोजी "दर्पण दिन व मूकनायक दिन" संयुक्तरित्या साजरा करण्याचे सर्वानूमते ठरविण्यात आले असून या कार्यक्रमाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या विविध स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी बीड जिल्ह्यातील पत्रकारांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. बीड जिल्ह्यातील पत्रकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी निवड समितीने स्व.नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारिता पुरस्कारा साठी घाटनांदूर येथील दैनिक लोकमतचे वार्ताहर नृसिंह सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली असून त्यांनी लिहलेल्या "घाटनांदूर रेल्वे शोभेलाच, असून अडचण नसून खोळंबा" या बातमीला हा पुरस्कार देण्यात येत आहे. स्व.मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी परळी वैजेनाथ येथील दैनिक आदर्श गांवकरीचे जगदीश शिंदे यांची निवड करण्यात आली असून त्यांनी लिहीलेल्या "तांडा वस्तीवरच्या शाळांना आणतात बंदी, गरिबांच्या लेकरांना कशी मिळणार संधी" या बातमीला हा पुरस्कार देण्यात येत आहे. तर बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले स्व.दत्ताआबा शिंदे आपेगावकर यांच्या स्मृतीनिमित्त घोषित करण्यात आलेल्या पुरस्कारासाठी पाटोदा येथील दैनिक बीड संकेतचे प्रा.बिभीषण चाटे यांची निवड करण्यात आली असून त्यांनी लिहलेल्या "तो तरुण मनोरूग्ण चार वर्षा नंतरही मृत्यूला नामोहरण करतोय" या बातमीसाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम रूपये 1001/- असे असून हा पुरस्कार वितरण सोहळा 4 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता स्व.विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृह, नगरपरिषद येथे महाराष्ट्र शासनाच्या गड किल्ले संरक्षण समितीचे सदस्य व व्याख्याते संकेत कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, केज मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे. या प्रसंगी जेष्ठ पत्रकार अमर काका हबीब, जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, भाजपा नेते रमेशराव आडसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजकिशोर मोदी, पृथ्विराज साठे, राष्ट्रीय काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख अनिल महाजन, बीड जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर, अप्पर पोलीस आधीक्षक कविता नेरकर, सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, स्वा.रा.तीचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, व्यंकटेश्वरा शुगर इंडस्ट्रीयल प्रा.लि.अंबासाखरचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जंगम, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक विनोद घोळवे आदी मान्यवर उपस्थितीत राहणार आसुन या सोहळ्यात जेष्ठ पत्रकार ज्यांनी की, सतत 40 वर्षे दैनिक लोकमत या दैनिकात उपसंपादक पदावर कार्यरत राहून आपल्या लिखाणातून वंचित, पीडितांना न्याय देऊन सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम तर केलेले अंबाजोगाईचे भूमिपुत्र ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे यांना मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष गजानन मुडेगावकर व सचिव विरेंद्र गुप्ता यांनी दिली आहे.


========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)