जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेने हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमातून भारतीय संस्कृती जोपासली



मकरसंक्रांत सणाचे औचित्य साधून महिलांसाठी हळदी - कुंकवाचा व तिळगुळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन 

======================

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) 

येथील जय जवान आजी - माजी सैनिक संस्थेमध्ये मकरसंक्रांत सणाचे औचित्य साधून महिलांसाठी हळदी - कुंकवाचा व तिळगुळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीचे संवर्धन व जोपासना करण्यात आली.



एकिकडे भारतीय संस्कृती मध्ये सणासुदीला खूप महत्त्व आहे. असे असताना ही दुसरीकडे माञ सध्याच्या धावपळीच्या काळात दिवसेंदिवस भारतीय सण-उत्सव साजरे करण्याकडे नव्या पिढीचा कल दिसून येत नाही, आपले पारंपरिक सण-उत्सव साजरे करण्याचे प्रमाण कमी होतेय की काय..? अशी परस्थिती निर्माण होत चालली असताना येथील जय जवान आजी - माजी सैनिक संस्थेमध्ये मकरसंक्रांत सणाचे औचित्य साधून महिलांसाठी हळदी - कुंकवाचा व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थेने भारतीय संस्कृतीतील लुप्त होत चाललेल्या अशा परंपरा, सण, उत्सव जोपासण्याचे काम हाती घेतलेले आहे. मकरसंक्रांत हा सण सुवासिनी महिला, भगिनी दरवर्षीच मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे महिलांना हा सण व्यापक स्वरूपात साजरा करता नाही आला. आपल्या सौभाग्याला दीर्घायुष्य लाभावे म्हणून महिला आपसांमध्ये गाठीभेटी घेवून, मैञिण, नातेवाईक आणि आप्तेष्ट यांच्या घरी जाऊन आणि आपल्या स्वतःच्या घरी बोलावून एकमेकींना हळदी - कुंकू लावून तिळगुळ आणि भेटवस्तू देवून आपल्या आयुष्याची वाटचाल अशीच गोड रहावी, ही चांगुलपणाची भावना मनात ठेवून मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात, विविध उपक्रम राबवून साजरी करतात. याच विधायक भूमिकेतून जय जवान आजी - माजी सैनिक संस्थेने संस्कृती जोपासत हळदी - कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास संस्थेतील शेकडो सुहासिनी महिला, मुली मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्यांनी हा कार्यक्रम साजरा केला. यावेळेस संस्थेतर्फे चहापाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रसंगी सुहासिनी महिलांसाठी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा म्हणून भेटवस्तू देण्यात आल्याची माहिती जय जवान आजी - माजी सैनिक संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.


========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)