आता शाळा प्रवेशासाठी आधारकार्ड सक्तीचे होणार..!



बोगस विद्यार्थी पटसंख्या रोखणे आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील

=======================

मुंबई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) 

बोगस विद्यार्थी पटसंख्या रोखण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने यापुढे शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांसह पालकांनाही आधार कार्ड जोडणे सक्तीचे करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे यापुढे शाळेत प्रवेश घेताना आता विद्यार्थ्यांसोबत पालकांचे आधारकार्ड सुद्धा सबमिट करणे सक्तीचे असून पालकांचे आधारकार्ड विद्यार्थ्यांसोबत लिंक केले जाणार आहे.



बीड जिल्ह्यातील बोगस पटसंख्येच्या प्रकारानंतर राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती पी.व्ही.हरदास यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीचा अहवाल स्वीकारून राज्य सरकारने शाळांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. बनावट पटसंख्या दाखवत अनेक शाळा कोट्यावधी रूपयांचे सरकारी अनुदान लाटत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर आता यापुढे शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांसह पालकांना ही आधार कार्ड जोडणे सक्तीचे करण्यात आले आहे.


=======================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)