राडी - मुडेगाव रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करा - अखिल भारतीय किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे यांची मागणी

राडी - मुडेगाव रस्त्यासाठी नागरिकांचे निवेदन ========================= अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) राडी - मुडेगाव या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. सदरील नादुरूस्त रत्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तरी इ.जी.मा.93 राडी - मुडेगाव या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी. अशी मागणी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश बिभिषण गंगणे यांनी सोमवार, दि. 26 जून रोजी उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंबाजोगाई यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, इ.जि.मा.93 राडी - मुडेगाव या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. सदरील रस्त्यावर पडलेल्या खड्डयामुंळे येणार्या - जाणार्या प्रवाशांचे हाल होत आहेत. राडी - मुडेगाव गावातील आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, वयोवृद्ध प्रवासी यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. खराब रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सदरील रस्त्यावर शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर ये - जा असल्याने त्य...