अंबाजोगाईत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचे नेतृत्व बळकट करण्याचा निर्धार
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) कार्यकर्त्यांच्या बैठकीत बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी
========================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
शहरात अंबाजोगाईत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्ता बैठकीचे आयोजन बुधवार, दि. 14 जून रोजी राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचे नेतृत्व बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या बैठकीस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्ता बैठकीचे आयोजन अंबाजोगाईत करण्यात आले होते. राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी यावेळी महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा सुनिताताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या हस्ते असंख्य महिला, युवक यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) या पक्षात जाहिर प्रवेश केला. या प्रसंगी मराठवाडा कार्याध्यक्ष बबन जंगले, मराठवाडा संघटक संजयभाऊ तेलंग, ओबीसी नेते राजेश पंडीत, तालुकाध्यक्ष अमर वाघमारे, अम्रपाली गजशिव यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या यशस्वितेसाठी प्रकाश वेदपाठक, उमा गायकवाड, अम्रपाली आल्टे, सुवर्णा गोरे, पुनम तुपारे, गंगासागर गायकवाड, जयश्री जगताप, काशिबाई माने आदींसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
==========================
Comments
Post a Comment