केज मतदारसंघात दर्जेदार व प्रशस्त रस्ते असावेत यासाठी प्रयत्नशील - आ.नमिताताई मुंदडा
खर्डा-चौसाळा-साळेगाव-माळेगाव रस्ता डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ
=========================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
केज मतदार संघात दर्जेदार व प्रशस्त रस्ते असावेत जेणे करून वाहतुक व्यवस्था सुरळीत होईल. नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी मतदार संघातील रस्त्यांच्या कामासाठी अधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना राज्य सरकार कडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विविध रस्ते कामाला भरिव निधी प्राप्त होत आहे. पक्के, मजबुत, प्रशस्त व दर्जेदार रस्ते ही खर्या अर्थाने ग्रामीण भागातील विकासाची नांदी आहे असे प्रतिपादन केज विधानसभा मतदारसंघाच्या आ.नमिताताई अक्षय मुंदडा यांनी केली. त्या खर्डा-चौसाळा-साळेगाव-माळेगाव रस्ता डांबरीकरणाच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या.
खर्डा-चौसाळा-साळेगाव-माळेगाव रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला भरीव निधी मिळावा यासाठी आ.मुंदडा यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्ते विकासासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला. मंगळवारी आ.नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते खर्डा-चौसाळा-साळेगाव-माळेगाव रस्ता डांबरीकरणास प्रारंभ झाला. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचे आभार मानले आहेत. खर्डा-चौसाळा-साळेगाव-माळेगाव रस्ता डांबरीकरणाच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा, अंकुशराव इंगळे, ऋषीकेश आडसकर, भगवान केदार, डॉ.वासुदेव नेहरकर, सुनिल गलांडे, विष्णु घुले, वसंतराव केदार, महादेव सुर्यवंशी, शरद इंगळे, लिंबराज फरके आदी मान्यवरांसह पंचक्रोषीतील ज्येष्ठ नागरिक, महिला, भगिनी, युवक वर्ग तसेच चिंचोली माळी, कापरेवाडी, नाव्होली येथील ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. खर्डा-चौसाळा-साळेगाव-माळेगाव रस्ता डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
=========================
Comments
Post a Comment