अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा पुरस्कार व पारितोषिक वितरण समारंभ




अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशने बांधिलकी जोपासली - खासदार डॉ.प्रितमताई मुंडे


ऍम्पाकडून वैद्यकीय क्षेत्रातील चांगुलपणाचे कौतुक - आमदार सौ.नमिताताई मुंदडा

==========================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने बांधिलकी जोपासत उत्कृष्ट कार्य सुरू ठेवले आहे. ऍम्पा हे सर्व पॅथींच्या डॉक्टरांची उपक्रमशील संघटना असून हे एक नाविन्यपूर्ण आणि बहूदा महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असेल असे सांगून आरोग्य सेवा देताना माणूसकी जोपासत ऍम्पा हे असोसिएशन आदर्श काम करीत असल्याचे प्रतिपादन बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले. तर ऍम्पाकडून विविध उपक्रम राबवून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आदर्श व्यक्तीमत्वांचे वेळोवेळी कौतुक करण्यात येते. हे अभिनंदनीय असल्याचे मत आ.नमिताताई मुंदडा यांनी व्यक्त केले.


येथील अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने रविवार, दिनांक 4 जुन 2023 रोजी पुरस्कार व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन आद्यकवी मुकूंदराज सांस्कृतिक सभागृह, अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. "माझी ऍम्पा, मी ऍम्पाचा" हे ब्रीद घेऊन मागील एक वर्षापासून अंबाजोगाई शहर व तालुक्याच्या वैद्यकीय क्षेत्रात विविध उपक्रम राबवून, कार्यक्रम आयोजित करून उल्लेखनीय कार्य करणार्‍या अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने ऍम्पा सन्मान पुरस्कार - 2023, ऍम्पा गोल्ड सन्मान आणि ऍम्पा सन्मान - 2023 चे वितरण आणि त्याच बरोबर ऍम्पाथॉन - 2023, बुध्दीबळ, कॅरम, बॅडमिंटन, क्रिकेट, गीतगायन या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी खा.डॉ.प्रितमताई मुंडे (बीड लोकसभा) तर मुख्य अतिथी म्हणून आ.नमिताताई मुंदडा (केज विधानसभा) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ओमप्रकाश शेटे (सहाय्यक सचिव, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री), राजकिशोर मोदी (अध्यक्ष, अंबाजोगाई पिपल्स बँक) आणि यावेळेस गोविंद शेळके (वृत निवेदक एबीपी माझा), ऍड.सुनील सौंदरमल (अध्यक्ष, आधार मल्टीस्टेट), डॉ.राहुल धाकडे या मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. प्रारंभी संगीततज्ज्ञ प्रा.राजकुमार ठोके, डॉ.स्वप्नाली सुवर्णकार, डॉ.अरूणा केंद्रे, डॉ.संदीप जैन, डॉ.देवराव चामनर, डॉ.अभय इडगार, डॉ.उद्धव शिंदे यांनी "महाराष्ट्र गीत" सादर केले. त्यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलन केले. अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, साहित्य आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल ऍम्पा भूषण पुरस्कार - 2023 साठी डॉ.नरेंद्र काळे, डॉ.शुभदा लोहिया, डॉ.श्रीनिवास रेड्डी, डॉ.नवनाथ घुगे, डॉ.अतुल देशपांड, डॉ.प्रल्हाद गुरव, डॉ.निशिकांत पाचेगांवकर यांना मान्यवरांच्या हस्ते सदरील पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरूस्काराचे स्वरूप पुष्पगुच्छ, शेला व सन्मानचिन्ह असे होते. त्यानंतर अंबाजोगाईच्या वैद्यकीय सेवेत सातत्याने भरीव कामगिरी करून वैद्यकीय सेवेचा चेहरा - मोहरा बदलणारे डॉ.नितीन पोतदार, डॉ.अतुल शिंदे, डॉ.विजय फड, डॉ.मंगेश काशिद, डॉ.हर्षा काळे, डॉ.सुनिल नांदलगावकर, डॉ.अरविंद शिंदे, डॉ.हनुमंत चोरमले, डॉ.विष्णु दहिफळे, डॉ.शेख जावेद, डॉ.निलेश तोष्णीवाल यांना अ‍ॅम्पा गोल्ड सन्मान प्रदान करण्यात आले. ऍम्पा सन्मानासाठी संघटनेच्या स्थापनेपासून ज्यांनी सक्रीयपणे सहकार्य केले असे डॉ.उद्धव शिंदे, डॉ.विवेक सुवर्णकार, डॉ.अनिल भुतडा, डॉ.विश्‍वजीत पवार, डॉ.महेंद्र जाधव, डॉ.संदीप जैन, डॉ.संदीप चव्हाण, डॉ.संदीप थोरात यांना अ‍ॅम्पा सन्मान - 2023 प्रदान करण्यात आले. शासकीय सेवेत असूनही ऍम्पा संघटनेबद्दल आत्मियता बाळगुण विविध उपक्रमात हिरीरीने सहभाग घेणारे डॉ.बालासाहेब लोमटे, डॉ.अरूणा केंद्रे, डॉ.चंद्रकांत चव्हाण, डॉ.नितीन चाटे आणि उत्कृष्ठ नर्सिंग स्टाफ तयार करणारे वुमन्स हॉस्पिटल नर्सिंग स्कुल व प्रमोद महाजन नर्सिंग स्कुल यांचे प्राचार्य यांचा ही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला. ऍम्पाथॉन स्पर्धेचे विजेते पुरूष गट डॉ.अरविंद शिंदे, डॉ.बालासाहेब हाके, डॉ.निशिकांत पाचेगावकर, महिला गट - डॉ.सुनिता तोंडगे, डॉ.अश्‍विनी भुसारे, डॉ.प्रिया तिडके तसेच अ‍ॅम्पा बुद्धीबळ स्पर्धेचे डॉ.दत्ता डिसले, डॉ.अनिल भुतडा, महिला गट डॉ.शुभदा लोहिया, डॉ.रेणुका गुंडरे, बॅडमिंटन पुरूष विजेते डॉ.शिवराज पेस्ट, डॉ.अनिल भुतडा, महिला विजेते डॉ.पल्लवी जाधव, व डॉ.हर्षा काळे, याचं बरोबर महिला व पुरूष क्रिकेट टीमला ही पारितोषिक देण्यात आले. या प्रसंगी मुख्य अतिथी आ.नमिताताई मुंदडा, ओमप्रकाश शेटे, राजकिशोर मोदी, पत्रकार गोविंद शेळके, अ‍ॅड.सुनिल सौंदरमल यांनी ही आपले यथोचित मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे यांनी केले. तर सुत्रसंचालन डॉ.ऋषिकेश घुले यांनी करून उपस्थितांचे आभार डॉ.विठ्ठल केंद्रे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशनचे डॉ.मनोज वैष्णव (उपाध्यक्ष), डॉ.विठ्ठल केंद्रे (सचिव), डॉ.महेश ढेले (कोषाध्यक्ष), डॉ.शितल सोनवणे (सहसचिव), डॉ.मनिषा पवार (कल्चरल सेक्रेटरी), डॉ.इम्रान अली (स्पोर्ट सेक्रेटरी), डॉ.सुधीर धर्मपात्रे (सदस्य), डॉ.योगिनी नागरगोजे (सदस्य), डॉ.ऋषिकेश घुले (सदस्य), डॉ.शिवाजी मस्के (सदस्य), डॉ. सुलभा पाटील, डॉ. विशाल भुसारे व सर्व सन्माननिय सभासदांनी पुढाकार घेतला. पुरस्कार व पारितोषिक वितरण समारंभ "रिदम" या कार्यक्रमास अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.


================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)