अंबाजोगाईत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव उत्साहात साजरा

वृक्षारोपण, प्रबोधनपर व्याख्यान, भव्य मिरवणुकीचे आयोजन

========================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे 

(लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

शहरात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या जयंती उत्सव सोहळ्यात शहर व तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा केला.


पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गोटु (दादा) थाटकर, उपाध्यक्ष नवनाथ चौरे यांच्या पुढाकाराने शहरात 298 वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. सकाळी 8 वाजता काशी विश्वनाथ मंदिर येथे अभिषेक करून व स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर चौकाचे सुशोभिकरण करून महाराष्ट्रात प्रथमच अंबाजोगाई येथे बसस्थानका समोरील चौकात "होळकर घराण्याची राजमुद्रा" स्थापन करण्यात आलेली आहे. त्यास प्रारंभी अभिवादन करण्यात आले. तसेच इतिहासकार रामभाऊ लांडे (होळकर राजघराणे, इंदौर) यांच्या प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन देखिल यावेळी करण्यात आले होते. व्याख्यानाचा विषय, " पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर : राज्य कारभार" हा होता. 31 हे रोजी सायंकाळी 5 वाजता धनगर गल्ली येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे विशेष आकर्षण लिंबगाव पाटी (ता.माळशिरस जि.सोलापूर) येथील "दोस्ती हालगी ग्रुप 333", हिंदूतेज शिवकालीन मर्दानी आखाडा (जखिनवाडी, ता.कराड, जि.सातारा), पारंपरिक गजे ढोल वाद्य पथक हे होते. तसेच यावेळी रूद्रराणी चौरे हिने अहिल्यादेवी होळकर यांची वेषभूषा साकारली. हजारोंच्या उपस्थितीत अंबाजोगाई शहरातून ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करीत संपूर्ण शहराच्या मुख्य चौक व प्रमुख रस्त्यांवरून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमास ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, सुदर्शन आप्पा काळे, ज्ञानोबा हेडे, कमलाकर हेडे, वामन काळे, लिंबाजी काळे, भाऊराव गवळी, अमोल लोमटे, तानाजी देशमुख,महेश कदम, संजय कोकाटे, प्रविण भाकरे, संजय पटाईत, भिमसेन लोमटे, विष्णू सरवदे, विठ्ठल काळे, प्रशांत हेडे, मल्हारी चौरे, दिनेश भराडीया, नंदकिशोर सातपुते, राजकुमार (बाळा) गायके, कृष्णा आगाशे, अशोक गंगणे, कृष्णा मडके, रामेश्वर हेडे, जयराम लगसकर, बिरू थाटकर, नवनाथ सरवदे, म्हाळाप्पा थाटकर, रितेश थाटकर, अंकुश मन्नाडे, नरसिंग होळकर, रमेश नाना भारजकर, देवकते सर, ॲड.जयंत भारजकर, गोविंद बापू शिंपले, बंडू भारजकर यांच्यासह पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समिती, धनगर गल्ली येथील अध्यक्ष गोटू दादा थाटकर, उपाध्यक्ष नवनाथ चौरे, अशोक हेडे, मंगेश थाटकर, साहिल शेवाळे, दत्ता गवळी, विलास गुरव, प्रमोद थाटकर, अमर शेवाळे, नितीन काळे, दत्ता माने, अमोल डोलारे, मारूती थाटकर, विशाल सरवदे, बाळासाहेब क्षीरसागर, अक्षय डोणे, ईश्‍वर डोणे, अशोक खामकर, सोनू थाटकर, लखन भाकरे, बिरू शेवाळे, देवा लांडगे, हरिभाऊ चौरे, लक्ष्मण चौरे, बबलू गायके आदींसह पदाधिकारी व समाज बांधव यांनी सहभाग घेतला. जन्मोत्सव सोहळ्याच्या यशस्वितेसाठी धनगर गल्ली, शहर व परिसरातील उत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेतला होता.

 


==========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)