राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत अंबाजोगाईच्या पार्थ अकॅडमीचा डंका ; सलग चौथ्या वर्षी मिळविले प्रथम विजेतेपद
पार्थ अकॅडमीचे संचालक विनोद आडे यांची माहिती
==========================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क
"सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर ऑलिम्पियाड" या राष्ट्रीय पातळीवरील दोन्ही स्पर्धेत सलग ४ थ्या वर्षी राज्यात प्रथम येण्याचा बहुमान अंबाजोगाईच्या पार्थ अकॅडमीने पटकावला आहे. अकॅडमीची स्नेहा राजमाने ही राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत राज्यात सर्वप्रथम आली आहे. आजतागायत अकॅडमीचे ६ विद्यार्थी हे राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत राज्यात सर्वप्रथम आले आहेत. कॅलिग्राफर विनोद आडे यांच्या पुढाकारातून असंख्य विद्यार्थ्यांच्या अक्षरात अमुलाग्र बदल व परिवर्तन झाले आहे. अकॅडमीच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन नुकतेच अंबाजोगाई येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले, प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, युवा नेते अक्षय मुंदडा, अंबाजोगाई पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक अभिजीत जगताप (गाठाळ), रामराव आडे यांच्या हस्ते अकॅडमीच्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी मौलिक मार्गदर्शन केले. तर याप्रसंगी अकॅडमीचे विद्यार्थी साक्षी आपेट, स्नेहा राजमाने, प्रिती आढाव आणि प्रणव कदम यांनी ही सत्काराला उत्तर दिले. तर अध्यक्षीय समारोप डॉ.राजेश इंगोले यांनी केला. प्रास्ताविक करताना पार्थ अकॅडमीचे संचालक विनोद आडे यांनी सांगितले की, मागील ७ वर्षांपूर्वी या स्पर्धेत मुंबईचेच विद्यार्थी सर्वप्रथम यायचे मात्र मुंबई व पुणे यांची मक्तेदारी खंडीत करण्याचे काम अंबाजोगाईच्या पार्थ अकॅडमीने करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या स्पर्धेत दरवर्षी संपुर्ण देशातून तब्बल ७ ते ८ लाख विद्यार्थी सहभागी होतात. आपले विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरांवर उत्तुंग यश मिळवत आहेत. पार्थ अकॅडमीच्या माध्यमातून मागील आठ वर्षांत बीड, लातूर, परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, सातारा, नाशिक, कोल्हापूर येथील २१०० पेक्षा अधिक विद्यार्थी प्रशिक्षित केले आहेत. तर पुढील काळात राज्यातील १० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणार असल्याचे विनोद आडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्योती शिंदे यांनी करून उपस्थितांचे आभार गोरोबा कानवले यांनी मानले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते : ग्रुप - बी (५ वी ते ८ वी) श्रीजा योगेशराव कुलकर्णी- प्रथम क्रमांक, शरयु बालाजी पडिले - द्वितीय क्रमांक, शिरीष गोरोबा कानवले - प्रथम क्रमांक यांचा सुवर्णपदक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन तर राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेतील संपुर्ण राज्यातुन सर्वप्रथम आलेल्या स्नेहा औदुंबर राजमाने हिचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच द एनसायक्लोपिडीया ऑफ ऍनीमल्स अ कम्प्लीट विज्युअल गाईड आणि रिडर्स डायजेस्ट रिव्हर्स डिक्शनरी हे दोन ग्रंथ तसेच पुष्पगच्छ देवून सन्मानित करण्यात आले. अकॅडमीचे संचालक विनोद आडे यांना पार्थ अकॅडमीस नॅशनल हॅन्डरायटिंग कॉम्पीटिशन व ऑलिम्पियाड मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रमाणपत्र, भेटवस्तु व पुष्पगुच्छ आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धा व ऑलंम्पीयाड स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते : ग्रुप - ए (९ वी ते १२ वी), साक्षी आपेट - (प्रथम क्रमांक), ओमकेश आंधळे - (द्वितीय क्रमांक), प्रणव कदम (तृतिय क्रमांक) यांना सुवर्णपदक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सोबतच ग्रुप - बी (५ वी ते ८ वी) स्नेहा राजमाने (प्रथम क्रमांक), ज्ञानदा वनवे (द्वितीय क्रमांक), प्रिती आढाव (तृतिय क्रमांक) यांना सुवर्णपदक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तर या सोबतच पार्थ अकॅडमीला बेस्ट परफॉर्मन्स स्कुल अवॉर्ड प्राप्त झाले. सतत चार वर्षे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत राज्यात सर्वप्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान प्राप्त केल्याबद्दल पार्थ अकॅडमीचे संचालक विनोद आडे यांचा ही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमोल खोकले, ओम पिंपळे, अनुतोष कातकडे, कृष्णा यादव, आकाश कराड, महेश अंबाड, अंकिता बुरांडे व अश्विनी विनोद आडे यांनी पुढाकार घेतला. गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभास गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
==========================
Comments
Post a Comment