वसुंधरा सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधील समावेशाबद्दल सृष्टी सुधीर जगताप हिचा विशेष सन्मान
जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांची प्रमुख उपस्थिती
==========================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
येथील वसुंधरा सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने बुधवारी (दि.१४) सकाळी १० वाजता आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतीक सभागृहात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वसुंधरा सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने देण्यात आली आहे.
प्रतीवर्षी केज मतदारसंघातील गुणवंतांचे कौतुक करण्याच्या उद्देशाने वसुंधरा सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ - मुंंडे (बीड), आ.सौ.नमिताताई अक्षय मुंदडा (केज विधानसभा मतदार संघ), पत्रकार गोविंद शेळके (एबीपी माझा), मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी, कौस्तुभ कोदरकर, प्रितम पन्हाळे, ज्ञान प्रबोधीनीचे अभिजीत जोंधळे, प्राचार्य एम.बी.शेट्टी, पत्रकार अभय कुलकर्णी (केज) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे प्रमुख आकर्षण लातूर येथे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जिच्या नांवाचा समावेश झाला ती सृष्टी सुधीर जगताप हिचा ही या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तरी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यास अंबाजोगाईतील शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे असे आवाहन वसुंधरा सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.
========================
Comments
Post a Comment