विधायक उपक्रम राबविणाऱ्या आ.नमिता अक्षय मुंदडा यांची तरूणाईत क्रेझ..!

कधी तरूणांना रोजगाराच्या संधी, तर कधी गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप...

==========================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघात सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करून आ.नमिताताई मुंदडा यांनी विधायक पायंडा निर्माण केला आहे. नुकतेच इयत्ता 10 वी 12 वी परिक्षेत उज्वल यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम आ.मुंदडा यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वीच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या विधायक हेतुने आ.मुंदडा यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले. आ.नमिताताई मुंदडा यांच्या कार्यकर्तृत्वामुळे तरूण, युवक, युवतींमध्ये आ.नमिताताई मुंदडा यांची क्रेझ निर्माण झाली आहे. आ.मुंदडा या आपले प्रश्‍न समजून घेतात. त्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात अशा भावना केज मतदारसंघातील तरूण, युवक वर्गांमध्ये निर्माण झाली आहे.


केज विधानसभा मतदार संघात मागील अनेक वर्षांपासुन ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा (काकाजी), अक्षयभैय्या मुंदडा यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मतदार संघातील तळागाळातील माणसाच्या मदतीला धावून जाण्याचे काम सातत्याने केले आहे. दिवंगत लोकनेत्या माजी मंत्री डॉ.विमलताई मुंदडा यांचा समाजसेवेचा वारसा त्यांच्या स्नुषा आ.नमिताताई मुंदडा या समर्थपणे सांभाळताना दिसत आहेत. यामुळेच की, काय मागील काही वर्षात आ. मुंदडा यांनी केज मतदार संघातील गाव, वाडी, वस्ती, तांडा येथे विकासाची विविध कामे सुरु आहेत. विविध योजनेतून मोठ्या प्रमाणावर निधी आणून आ.मुंदडा यांनी केज मतदार संघातील विकासाच्या विविध प्रश्‍नांची सोडवूणक केली आहे. जनतेशी कायम संवाद ठेवून त्यांचे प्रश्‍न, म्हणणे ऐकून घेत त्यांच्याशी चर्चा करत आ.मुंदडा यांनी भरीव निधी उपलब्ध केल आहे. या कामी त्यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध आहे. शाश्वत विकासाची कामे करण्यासोबतच आ.नमिताताई मुंदडा यांनी मागील काही वर्षात केज मतदार संघात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध कशा होतील यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत. काही दिवसांपूर्वी आ.मुंदडा यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यातून आठशे पेक्षाही अधिक तरुणांना नोकरीची संधी मिळाली. त्यामुळे प्रत्येक वर्षी २३ मार्च रोजी रोजगार मेळावा आयोजित करून नामांकित कंपन्यांना त्यासाठी आमंत्रित करण्याचा निर्धार आ.मुंदडा यांनी केला आहे. भविष्यात या मेळाव्यांमधून केज मतदार संघातील हजारो तरुणांना आंतरराष्ट्रीय कंपन्यामधून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. नुकताच आ.मुंदडा यांनी अंबाजोगाईत इयत्ता 10 वी 12 वी परिक्षेसह स्पर्धा परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन करणार्‍या 700 हून अधिक विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. पाठीवर मान्यवरांच्या हस्ते कौतुकाची थाप दिली आहे. या दोन्ही कार्यक्रमांना जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ यांनी हजर राहून करिअर विषयक मार्गदर्शन केले. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्या माध्यमातून कधी तरुणांना रोजगाराच्या संधी, तर कधी गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप आणि सोबतच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचे मार्गदर्शन असे भवितव्यासाठी बहुपयोगी उपक्रम राबविणाऱ्या आ.नमिताताई अक्षय मुंदडा या केज मतदार संघातील तरूण पिढीला आपल्या हक्काच्या आमदार वाटू लागल्या आहेत.


=========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)