पार्थ अकॅडमीच्या वतीने शनिवार, दिनांक 10 जून रोजी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन - संचालक विनोद आडे यांची माहिती

पार्थ अकॅडमीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे 8 वे वर्षे ; राज्यात अव्वल 

==========================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

पार्थ अकॅडमीच्या वतीने नॅशनल हँडरायटींग कॉम्पीटीशन व नॅशनल हँडरायटींग ऑलिम्पियाड या स्पर्धेत सलग 4 थ्या वर्षात राज्यात प्रथम आलेल्या व इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन शनिवार, दि. 10 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता स्वयंवर मंगल कार्यालय संत सावतामाळी चौक, अंबाजोगाई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संचालक विनोद आडे यांनी केले आहे.



या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी शिक्षण सभापती तथा सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले, अंबाजोगाई पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा संपादक अभिजीत जगताप या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक हे देखील या कार्यक्रमास मोठ्या संख्येने आवर्जुन उपस्थितीत राहणार आहेत. अशी माहिती पार्थ अ‍ॅकॅडमीचे संचालक विनोद आडे यांनी दिली आहे.

===========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)