शेपवाडीची दिपाली कोल्हापुरे झाली महिला पोलीस

दिपाली कोल्हापुरेचा शेपवाडीकरांनी केला ह्रद्य सत्कार

==========================अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) अंबाजोगाई शहरापासून नजीक असलेल्या मौजे शेपवाडी येथील दिपाली बजरंग कोल्हापुरे हिने अतिशय कष्टातून मोठ्या परिश्रमाने नूकतेच मुंबई पोलीस दलात भरती प्रक्रियेत यश संपादन केले आहे.


दिपालीचे आई-वडील सहा महिने शेपवाडी गावात गावमजूर म्हणून काम करतात, तर सहा महिने ते महाराष्ट्र राज्यासह इतर कोणत्याही राज्यात जाऊन ऊसतोडीचे काम करतात. घराचे छप्पर डोक्याला लागेल एवढ्या आकाराच्या उंचीच्या दोन जेमतम कुडाच्या खोल्यांचं विश्व असलेल्या बजरंग आणि त्यांच्या पत्नीने अतोनात काबाडकष्ट करत आपल्या मुलीचे कष्टाळू धोरण ओळखत तिला लागेल ते पुरवत तिच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवली आणि त्याच तयारीला आशीर्वाद समजून दिपालीने आई-वडिलांची ईच्छा-आकांक्षा, त्यांचा शब्द, त्यांची मनोकामना वाया न जाऊ देत हा काबाडकष्टाचा खेळ आई-वडिलांनी असाच कुठपर्यंत खेळायचा. त्यात मी लेकीची जात. कधीही शेवटी दुसर्‍याचं धन. मी माझ्या आई-वडिलांसाठी कधी काय आणि कसे काहीतरी करू शकणार....? या विचाराने अस्वस्थ असलेल्या दिपालीने कोरोनासारख्या महामारीच्या पर्वाला न जुमानता आपले परिश्रम आणि एकाग्रता कायम ठेवत अखेर कालच्या भरतीमध्ये यश संपादित केले आणि ती महाराष्ट्र पोलीस दलात मुंबई पोलीस म्हणून आता लवकरच प्रत्यक्ष सेवेला सुरुवात करणार आहे. मुलगी ही शेवटी परक्याचे धन असते असे समाज मानतो. त्याचे भान ठेवून गावातील कुंभार समाजातील ती पहिली महिला पोलीस. या नंतर ती आपल्या गावावरती केंव्हा येईल? आली तरी ती किती दिवस असेल-नसेल याची जाण ठेवत नेहमीच गावाच्या सामाजिक-राजकीय-धार्मिक आणि शैक्षणिक कामात हिरारीने पुढाकार घेणारे शेपवाडीचे माजी सरपंच विष्णुपंत शेप यांनी यावेळीही पुढाकार घेऊन दिपालीच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.

शेपवाडीकरांनी केला दिपालीचा ह्रद्य सत्कार :

अंबाजोगाई शहरातील पत्रा व्यवसायातील एक नामांकित उद्योजक विष्णूतात्या उमाजी शेप यांना नेहमीच कुठल्याही विधायक कार्यक्रमात मदत करणारे त्यांचे सहकारी शेपवाडी गावचे सेवा सहकारी सोसायटीचे आणि त्रिदल माजी सैनिक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ग्याननदेवआण्णा शेप यांच्या निवासस्थानी हा छोटेखानी सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी गावातीच बीड जि.प.सदस्या जयश्री बालासाहेब शेप, माजी सरपंच सौ.सिमींता ग्यानदेव शेप, अंकुशराव ढोबळे, उपसरपंच तथा वीरकृष्ण अर्बन निधी बँकेचे चेअरमन बालासाहेब पाटलोबा शेप, माजी उपसरपंच तथा शेपवाडी से.स.सो.चे व्हाईस चेअरमन सुप्रसिद्ध गायक स्वररत्न सुभाषराव शेप, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ शेप, प्रा.बाळासाहेब शेप, महेश लोंढाळ, अंगद शेप, पत्रकार सुनिल सिरसाट, गावातील प्रतिष्ठित नागरिक नरसुआबा शेप, नारायण कोल्हापूरे, बंकट शेप, शासकीय गुत्तेदार संभाजी शेप, विष्णुपंत शेप यांच्यासह असंख्य गावकरी पुरुष महिला सदस्यांची यावेळी उपस्थिती होती. या प्रसंगी नवनिर्वाचित महिला पोलीस दिपाली बजरंग कोल्हापुरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मनोगतात त्यांनी आपल्या आई-वडील आणि शेपवाडी येथील गावकर्‍यांविषयी कृतज्ञता करताना मी एवढ्यावरच न थांबता भविष्यात पोलीस उपनिरीक्षक आणि त्याहीपेक्षा पुढची पदे मिळवण्यासाठी धडपडणार असून यासाठी मला तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची आणि अशीच कौतुकाची थाप अपेक्षित आहे असेही दिपाली यांनी आपल्या मनोगतात आपल्या भावना व्यक्त करताना बोलून दाखवले.

========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)