तलाठ्याच्या त्रासाला कंटाळुन शेतकर्याने दिला आत्मदहनाचा इशारा
==========================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
जमीन महसुल अधिनियम 155 च्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणार्या तलाठ्याच्या त्रासाला कंटाळून सदरील शेतकर्याने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. सदरील प्रकरण हे मौजे उजनी येथील जमीन गट नं.535 च्या संदर्भातील आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, शंकर दत्तराव माने यांची मौजे उजनी येथे गट नं.535 मध्ये जमीन आहे. सदरील जमिनीच्या मुळ 7/12 चे ऑनलाईन संगणकीकृत नोंद होत असताना महसुली कर्मचारी (तलाठी) यांच्याकडून नजर चुकीने सदरील 7/12 च्या ऑनलाईन संगणकीकृत नोंदी मध्ये मालकी रकाण्यात मुळ खातेदाराचे नांव कमी होवून त्या ठिकाणी सरकारी गायरान अशी चुकीची नोंद झालेली आहे. ती चुकीची नोंद दुरूस्त करावी म्हणून शंकर माने यांनी सातत्याने महसुल विभागाकडे पाठपुरावा केला. जमीन महसुल अधिनियम 155 च्या अंतर्गत प्रकरण दाखल करून सुनावणी घेतली व सुनावणी अंती व इतर कार्यालयातील महसुली पुराव्याचे आधारे तत्कालीन नायब तहसिलदार यांनी दि.17/03/2020 रोजी 7/12 चे दुरूस्ती बाबत आदेश पारीत केलेला आहे व त्या आदेशात सष्टपणे असे निर्देशीत केलेले आहे की, सदरील जमीन ही सरकारी जमीन नसून ती जमीन खाजगी स्वरूपाची जमीन आहे. त्यानुसार सदरील संगणकीकृत 7/12 मध्ये मुळ 7/12 प्रमाणे पूर्वी प्रमाणेच नोंद घेण्यात यावी असा आदेश पारीत झालेला आहे. असे असताना ही उजनी सज्जाचे तलाठी हे त्यांच्या मनमानी प्रमाणे व गावातील काही विशेष व्यक्तीच्या सांगण्यावरून मा.नायब तहसिलदार यांचे आदेशांचे पालन करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. या प्रकरणातील अर्जदार शेतकरी शंकर दत्तराव माने यांनी यापूर्वी दिनांक 25/06/2020, 17/06/2022 आणि 20/03/2023 तसेच मा.उपविभागीय, अधिकारी यांचे दिनांक 17/06/2022 रोजीचे वेगवेगळे पत्र देवुन सदरील आदेशांची अंमलबजावणी करण्याबाबत कळविलेले आहे. परंतु, उजनी सज्जाचे तलाठी हे वरीष्ठांच्या कोणत्याही आदेशांचे पालन न करता काही कारण व उलट-सुलट पत्रव्यवहार करून सदरील आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करून अर्जदार शेतकरी शंकर माने यांना या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. सदरचे जमीनीबाबत स्पष्टपणे आदेश असताना निव्वळ दिनांक 17/03/2020 ते आजपावेतो माने यांचा मानसीक छळ करीत आहेत. सदरील तलाठ्याच्या त्रासाला अर्जदार शेतकरी शंकर माने हे कंटाळले आहेत. वारंवार लेखी अर्ज देवून सदरील तलाठ्या विरूध्द कोणत्याही प्रकारची कायदेशीर शिस्तभंगाची कार्यवाही झालेली नाही. तरी आपल्यावरील झालेला अन्याय दूर करणेसाठी व वरीष्ठांचे आदेशांचे पालन न करणार्या तलाठी उजनी यांचे विरूध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येवून सदरील आदेशांची अंमलबजावणी करण्याबाबत आदेशीत करण्यात यावे. या मागणीसाठी तलाठी सज्जा उजनी यांच्या त्रासास कंटाळून तहसीलदार, अंबाजोगाई यांच्या कार्यालयाचे समोर गुरूवार, दि.15/06/2023 रोजी आपण आत्मदहन करून स्वतःचे जीवन संपवणार असल्याचा इशारा देवून त्याची सर्वस्वी जबाबदारी तहसील कार्यालय अंबाजोगाई व शासनाची असेल. या प्रकरणी मला न्याय देवुन पुढील होणारी अनुचीत घटना टाळावी अशी विनंती अर्जदार शेतकरी शंकर दत्तराव माने यांनी तहसीलदार अंबाजोगाई यांना गुरूवार, दि. 1 जून रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदरील निवेदनाच्या प्रती मा.मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा.महसुल मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, बीड., अप्पर जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांना माहितीस्तव देण्यात आल्याची माहिती अर्जदार शेतकरी शंकर दत्तराव माने यांनी आमच्या प्रतीनिधीशी बोलताना दिली आहे.
==========================
Comments
Post a Comment