आ.नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते पावणेतीन लाखांच्या धनादेशाचे वाटप

नैसर्गिक आपत्तीत दगावलेल्या पशुधनाची शेतकऱ्यांना मिळाली नुकसान भरपाई

==========================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) 

केज विधानसभा मतदारसंघातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये दगावलेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाईसाठी आ. नमिता मुंदडा यांनी राज्य शासनाकडे केला होता. त्यानंतर शासनाकडून नुकसान भरपाईपोटी मंजूर झालेल्या एकूण पावणेतीन लाखांच्या रकमेच्या धनादेशांचे वितरण आ.मुंदडा यांच्या हस्ते शेतकऱ्यांना करण्यात आले. 


शेतकऱ्यांना नेहमीचा कोरडा दुष्काळ, ओळ दुष्काळ सह इतरही विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. त्यात वीज पडून पशुधन मृत होण्याचे प्रमाण अधिक असून त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. चालू वर्षी एप्रिल महिन्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाउस होऊन शेकार्यांचे नुकसान झाले. केज मतदार संघात अनेक ठिकाणी वीज कोसळून बैल, गाय, शेळ्या, आदी जनावरे ठार झाल्याच्या घटना घडल्या. आ. नमिताताई मुंदडा यांनी या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यास यश येऊन शासनाने आठ शेतकऱ्यांना दगावलेल्या पशुधनाची नुकसान भरपाई मंजूर केली. नुकतेच केज तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आ. मुंदडा यांच्या हस्ते या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यात महालिंग शिवलिंग तागडे (काळेगाव घाट), रामभाऊ आप्पाराव नागरगोजे (बनकरंजा), आण्णा दत्तु मुळीक (मांगवडगाव), नवनाथ दगडू कोरडे (कोरडेवाडी), गणेश शुक्राचार्य यादव (हादगाव), लक्ष्मण बाबासाहेब आंधळे (रामेश्वरवाडी), महेन्द्र संपतराव हांगे (रामेश्वरवाडी) आणि जयराम तुकाराम हांगे (रामेश्वरवाडी) यांचा समावेश आहे. या धनादेश वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी वर्गाला आर्थिक पाठबळ दिल्याचे समाधान असून इथून पुढच्या काळात देखील कोणत्याही परिस्थितीत हे सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असेल, असा विश्वास आ.नमिताताई मुंदडा यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.

==========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)