सक्षम पिढी घडविण्यासाठी 'आई सेंटर'चे योगदान मोलाचे : उपप्राचार्य डॉ.आर.व्ही.कुलकर्णी
अंबाजोगाईत आई सेंटर कॅंपस येथे 'विद्यार्थी - पालक - शिक्षक' मेळाव्याचे आयोजन
========================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
शालेय व महाविद्यालयीन जीवनात मुलांचा सर्वांगीण विकास साधणे हे अत्यंत महत्त्वाचे असून यासाठी विश्वविक्रमवीर प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आई सेंटरचे कार्य हे समाज उपयोगी व देश हिताचे असून त्यास मिळणारा पालकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद यामुळे सक्षम पिढी घडविण्यासाठी इन्फॉर्मेशन एक्सचेंज सेंटर अर्थात 'आई सेंटर'चे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन योगेश्वरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर.व्ही.कुलकर्णी यांनी आई सेंटर कॅंपस, संत सावता माळीनगर, अंबाजोगाई येथील 'विद्यार्थी - पालक - शिक्षक' मेळावा तसेच उन्हाळी बॅचेस मधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यात केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आई सेंटरचे संस्थापक, 'द डायनामिक कम्युनिकेटर' या आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलिंग पुस्तकाचे लेखक तथा विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे हे होते. पुढे बोलताना डॉ.आर.व्ही.कुलकर्णी यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील व शहरी भागातील शिक्षण या दोघांमधला असलेला खूप मोठा स्किल गॅप म्हणजेच कौशल्याचा अभाव यामुळे त्यांच्या शैक्षणिक तसेच करिअरमध्ये ठरू पाहणारा खूप मोठा अडथळा दूर करून अगदी बालवयापासून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, खात्रीने इंग्रजी बोलण्यासाठी तसेच स्टेज करेज व प्रभावी भाषणाच्या क्षमतेसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक तथा विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे व संपूर्ण टीम हे मागील दीड दशकांपासून सातत्याने करत असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील करिअरच्या विविध संधीचे व नोकरीचे दारे खुली करण्याचे कार्य अत्यंत प्रभावीपणे करीत असल्याचे नमूद केले. कोरोना काळात एकीकडे सर्व देशभरातील व जगभरातील शाळा व महाविद्यालये बंद असताना आई सेंटरच्या माध्यमातून व आपल्या प्रभावी संभाषण व नेतृत्व कौशल्यामुळे देशभरात व जगभरातील अग्रगण्य असलेले देश यामध्ये अमेरिका, लंडन, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, व इतर देशातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्रित करून विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार व जिज्ञासू व्यक्तींना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व विविध कोर्सेसद्वारे नाविन्यपूर्ण व अतिशय उत्साहाने आणि उत्कृष्टपणे ज्ञानदानाचे कार्य यामध्ये सातत्य राखत उल्लेखनीय कामगिरी बजावली व परिस्थिती कोणतीही असो आपण सतत ज्ञानार्जन करीत लोकल ते ग्लोबलचा प्रवास करण्यासाठी सर्वांना प्रेरित केले असे ही गौरवोद्गार डॉ.आर व्ही.कुलकर्णी यांनी काढले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही विविध भागातून व राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी आई सेंटर कॅंम्पस येथे दोन महिन्यांचे खास उन्हाळी वर्ग आयोजित करण्यात आले होते. यात ग्रुप ए- पहिली ते चौथी, ग्रुप बी- पाचवी ते सातवी, ग्रुप सी- आठवी ते दहावी व ग्रुप डी- अकरावी ते पुढे या बॅचेसचा समावेश होता. यात प्रामुख्याने इंग्रजी संभाषण कौशल्यासोबतच विद्यार्थ्यांची लिखाण, वाचन, बोलणे व श्रवण करणे या अत्यंत महत्त्वाच्या क्षमता विकसित करण्यात आल्या. सोबतच व्यक्तिमत्व विकास, स्टेज करेज, आत्मविश्वास वाढविणे व ताण-तणाव, चिंता यापासून मुक्त राहण्यासाठी तसेच मुलांच्या गुणवत्ता वाढ, निर्णय क्षमता, करिअर गाईडन्स यात वैज्ञानिक 'सायकोमेट्रिक टेस्ट म्हणजेच कलचाचणी' यामुळे स्वतःमधील सुप्त गुण ओळखून देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्यासाठी "शिक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व पुरस्कार" प्राप्त तथा विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांचेकडून प्रभावीपणे प्रशिक्षण देण्यात आले. या विद्यार्थी पालक मेळाव्यात 'ग्रुप ए' मधील : यश नागेश जोंधळे, शुभ्रा राऊत, अभिराज पवार, वैष्णवी पुदाले, धनश्री म्हेत्रे, राजवीर जोगदंड, गौरव शिंदे व मुकुंदराज देशमुख तर 'ग्रुप बी' मधील : सार्थक भिसे आदित्य दवणे व 'ग्रुप सी' मधील : सायली किर्दंत, स्मिता गायकवाड, पलक खरटमोल, सोनाली जाधव, शौर्य पवार, वरद मुगे, गजानन चाळक ओमराजे पवार आणि 'ग्रुप डी' मधील : नम्रता बनसोडे, पौर्णिमा विरधे, अदिती जहागीरदार, ओमकार गलांडे, सॉफ्टवेअर इंजिनीयर रोहित कोंबडे, श्रेयश पवार व अनिकेत पाटील या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेण्यापूर्वी व प्रशिक्षण घेत असतानाच्या वेळी त्यांच्यामध्ये झालेले महत्त्वपूर्ण बदल व भविष्यातील मिळणाऱ्या संधीचे सोने करण्यासाठी आलेला अनुभवांना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त करत विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे व आई सेंटरच्या संपूर्ण टीमचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी 'एआय : आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा पदव्यूत्तर पदवीचा अभ्यासक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे प्रथम वर्षात चमकदार कामगिरी करणारी आई सेंटरची सन 2015 बॅचची विद्यार्थिनी आम्रपाली दादासाहेब कसबे यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला. या भव्य पालक मेळाव्याचे प्रास्ताविक आई सेंटरचे संस्थापक सर नागेश जोंधळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टॉप परफॉर्मर ठरलेली श्रेया बालाजी शेंगोळे यांनी इंग्रजीत अतिशय प्रभावीपणे केले. आई सेंटर व सर नागेश जोंधळे तसेच पाहुण्यांचा परिचय माधुरी महारूद्र व्यवहारे यांनी करून दिला. शेवटी तरूण प्रशिक्षक प्रतिक प्यारेलाल गौतम यांनी उपस्थितांना स्वतःचा आई सेंटरसोबतचा 25 महिन्याचा प्रवास त्यातील 20 महिने ऑनलाईन व जानेवारी ते जून पाच महिने ऑफलाईन यात सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक असलेले सर नागेश जोंधळे यांच्या मार्गदर्शनामुळे अमुलाग्र बदल होऊन यश प्राप्तीचा मार्ग सुखकर झाल्याचे सांगितले व आमच्या आई सेंटर येथील आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी व त्यात सातत्य राखण्यासाठी पुढील विविध कोर्सेसला प्रवेश घेण्यासाठीचे आवाहन करीत सर्वांचे ऋण व्यक्त केले.
================================
Comments
Post a Comment