वर्णी महापूजेने अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष महोत्सावास प्रारंभ

अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरात आराध बसण्यासाठी महिलांची मोठी गर्दी ============== ========= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे. आज बुधवारी सकाळी वर्णी महापूजेने मार्गशीर्ष महोत्सवास प्रारंभ झाला. अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव व सौ.शिवकन्या यादव यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली. या वर्णी महापूजेने या महोत्सवाची सुरूवात झाली. मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदीर परिसरात सलग नऊ दिवस आराध बसण्याची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. या वर्षी मंदिरात जवळपास ४ हजार महिला बसल्याची माहिती देवल कमिटीच्या वतीने देण्यात आली. बुधवारी सकाळी झालेल्या महापूजेनंतर महिलांची मंदिरात आराध बसण्यासाठी गर्दी वाढू लागली होती. शहर वासियांनी योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा केल्या होत्या. यावेळी झालेल्या महापूजेला अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव व सौ.शिवकन्या यादव यांनी...