लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क
शैक्षणिक संस्थाकडून शिक्षण व सामाजिक परिवर्तनाची गरज
- प्रख्यात साहित्यिक व माजी आमदार राम कांडगे यांचे मत
================
अंबाजोगाई (विशेष प्रतिनिधी)
शैक्षणिक संस्थाकडून शिक्षण व सामाजिक परिवर्तनाची गरज आहे हे काम यशवंतराव चव्हाण यांनी आयुष्भर केले. देशाला आज त्यांच्या विचारांची खरी गरज आहे असे मत प्रश्न प्रख्यात साहित्यिक, माजी आमदार तथा रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राम कांडगे यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती चव्हाण समारोहाच्या समारोपीय कार्यक्रमातील अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर स्मृती समारोह समितीचे सचिव दगडू दादा लोमटे, पुरस्कार प्राप्त मान्यवर पंजाबराव देशमुख, सौ.इंदुमती जोंधळे, सुर्याची बाबुराव बोरगावकर, प्रदीप जोगदंड आणि रजनी वर्मा यांची उपस्थिती होती. आपल्या विस्तारीत भाषणात बोलतांना राम कांडगे पुढे म्हणाले की, राज्याची खरी संताची परंपरा आहे. नम्रता हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे. संत ज्ञानेश्वर, तुकारामांनी मानवतावाद सांगितला. बालवयातच
यशवंतरावांच्या आई विठाबाई त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी वाचून घ्यायच्या त्यामुळे त्यांच्यावर ज्ञानेश्वरीच्या विचारांचा पगडा होता. त्यांच्यावर ही बौध्दीक पेरणी बालवयातच झाली, यशवंतराव म्हणत माझी अक्षरशुन्य आई हीच माझी पाठशाळा आहे असे ते मानत होते. असे सांगून यशवंतरावांनी मुख्यमंत्री झाल्यावर घेतलेले महत्वाचे निर्णय त्यांनी सांगितले. परिवर्तन काय असते हे यशवंतरावांनी दाखवून दिले. १९६० मध्ये त्यांनी शिक्षणासह विविध निर्णय घेऊन राज्यात खले परिवर्तन घडवले. सध्या राज्यात जे चालले आहे ते पाहून वेदना होत असल्याची खंतही राम कांडगे यांनी व्यक्त केली. हा तीन दिवसीय स्मृती समारोह ही समिती चालवते, म्हणजेच यशवंतराव चव्हाणांचे तुम्ही खरे वारस आहात असे कौतुक ही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात समारोह स्मृती समितीचे सचीव दगडू लोमटे यांनी मागील ३७ वर्षे घेण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमातून यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जागर सुरू असल्याचे सांगितले. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या जडण-घडणीत आणि स्वातंत्र्य चळवळीत केलेल्या योगदानाचा जागर करण्यासाठी हा समारोह आयोजित करण्यात येतो असे सांगितले. यशवंतराव चव्हाण यांनी साहित्य, संगीत, सांस्कृती आणि राजकारण या क्षेत्रात घालून दिलेला मापदंड आज ही कायम आदर्शवादी आहे. त्यांच्या विचारांचा हा जागर कायम ठेवण्यासाठी हा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह साजरा करण्यात येतो असे सांगत या स्मृती समारोहाच्या निमित्ताने देण्यात येणा-या सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या कार्याचा गौरव ही दगडू लोमटे यांनी केला.या ३८ व्या समारोहाचा समारोप ज्येष्ठ लेखक, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार राम कांडगे यांच्या हस्ते करण्यात येत असल्याचा आपल्या मनस्वी आनंद होतो आहे असे दगडू दादा लोमटे म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मेघराज पवळे यांनी केले. तर उपस्थित पाहुण्यांचा परिचय अभिजित जोंधळे व प्रा.मिसाळ यांनी करून दिला. आज यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या समारोपीय दिवशी २७ नोव्हेबर रविवार रोजी सकाळी १०.३० वा. शेतकरी परिषदेचे आयोजन केले होते. ही परीषद प्रयोगशील शेतकरी व प्रसिद्ध कृषी कार्यकर्ते पंजाबराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. "माझी शेती काही अनुभव" या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. तर अंबाजोगाई कृषी महाविद्यालय येथील सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड यांनी "किड व्यवस्थापन - सद्यस्थिती" या विषयावर मार्गदर्शन केले. अंबाजोगाई येथील तरूण अभ्यासक वकील ऍड.अजय बुरांडे यांनी 'शेती, शेतकरी व पीक विमा' या विषयावर मार्गदर्शन केले.
▪️ पुरस्कार वितरण :
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या समारोपीय कार्यक्रमात चाकण येथील खेडचे माजी आमदार, लेखक व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राम कांडगे यांच्या हस्ते मराठवाड्यातील कृषी, साहित्य, संगीत व युवा (युवा व्याख्याता) या क्षेत्रातील चार गुणवंतांचा यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यात लोखंडी सावरगाव येथील प्रयोगशील शेतकरी, शेतकऱ्यांचे प्रेरणास्थान, पंजाबराव देशमुख यांना कृषी, मूळच्या अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील रहिवासी असलेल्या पण आता पुणे येथे स्थायिक झालेल्या ज्येष्ठ लेखिका इंदुमती अरविंद जोंधळे यांना साहित्य, लातूर येथील सुरमणी बाबूराव बोरगावकर यांना संगीत तर अंबाजोगाईचेच जागतिक कीर्तीचे तरुण शिल्पकार प्रदीप जोगदंड व रजनी वर्मा - जोगदंड यांना युवागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, रोख पाच हजार रूपये, शाल, पुष्पगुच्छ असे आहे. या शानदार कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.मेघराज पवळे यांनी केले. २५, २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जागवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहातील सर्वच कार्यक्रमास या विभागातील नागरीकांनी अभुतपूर्व असा प्रतिसाद दिल्याबद्दल यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे सचिव दगडू (दादा) लोमटे व स्मृती समारोह समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी समारोहास उपस्थित रसिक, श्रोते आणि नागरिकांचे धन्यवाद मानले आहेत.
======================
Comments
Post a Comment