ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फ


डणवीस, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार आणि माजी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

================

मुंबई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

मराठी आणि हिंदी चित्रपट आणि नाटक क्षेत्रात आपल्या अभिनयाने दबदबा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे काही तासांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपट जगताचे कधीही न भरून येणारे नुकसान झाल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विक्रम गोखले यांना ट्वीटरच्या माध्यमातून गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. त्यांचा जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”, असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लिहितात, “मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने चित्रपटजगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे.” तसेच उपमुख्यमंञी देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली आहे. विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते, बोलते विद्यापीठ हरपले आहे. एक चतुःरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंत नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले हे व्यक्तिमत्त्व म्हणजे विक्रम गोखले होते. भारदस्त अभिनेता, देहबोली आणि डोळ्यांतून भाव व्यक्त करण्याचे त्यांचे कसब आणि आत्मविश्वासी बाणा हे क्वचितच कुणाला लाभले असेल. प्रत्येक भूमिकेला त्यांनी सुयोग्य न्याय दिला होता. माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे म्हणाले की, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या निधनाच्या वार्तेवर विश्वास बसत नाही. त्यांचे जाणे मनाला चटका लावणारे आहे. त्यांची एक कसदार राजबिंडा अभिनेता म्हणून ओळख होती.

अनेक विषयांवर त्यांची मते ठाम होती. त्यामुळे त्यांचे जाणे मनाला मान्य होत नाही. देशाचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी देखील विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहत प्रतिक्रिया दिली आहे.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे.

रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी तिन्ही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी व चित्रपट सृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता हरपला असे देशाचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार म्हणाले आहेत.


================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)