यशंवतराव चव्हाण स्मृती समारोहच्या शालेय चित्रकला स्पर्धा व बालआनंद मेळाव्यास विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद
यशंवतराव चव्हाण स्मृती समारोहच्या शालेय चित्रकला स्पर्धा व बालआनंद मेळाव्यास विद्यार्थ्यांचा अ
भूतपूर्व प्रतिसाद ; तालुक्यातील 50 शाळेतील सात हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
================
अंबाजोगाई (विशेष प्रतिनिधी)
38 व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहच्या दुस-या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरूवात शालेय चित्रकला स्पर्धा व बाल आनंद मेळाव्याने झाली. “शालेय चित्रकला स्पर्धा” हे या समारोहातील वैशिष्ठ पूर्ण उपक्रम आहे. या स्पर्धेत अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शाळेतील शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यंदा तालुक्यातील 50 पेक्षा जास्त शाळेतील सात हजार तीनशे विद्यार्थ्यांनी “रंगभरण व स्मरण चित्रे” स्पर्धेत सहभाग नोंदविला. यंदा दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविनला होता.
या शालेय चित्रकला स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना एस.पी. महाविद्यालय, पुणे येथील प्रा.विनय आर.आर. यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी प्रसिध्द शिल्पकार प्रदीप जोगदंड, सौ. रजनी वर्मा व सहशिक्षक युवराज माने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी समितीचे सचिव दगडुदादा लोमटे होते. या प्रसंगी युवराज माने लिखित “गुरूजी मला तू आवडला” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेचे परिक्षक म्हणुन ज्येष्ठ चित्रकार त्र्यंबक पोखरकर, सचिन भोकरे, मधु शिनगारे यांनी काम पाहिले.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी
1) रंगभरण स्पर्धा :- प्रथम- श्री. भुरे सर्वजीत बलभीम- खोलेश्वर विद्यालय, अंबाजोगाई.
द्वितीय:- कु.काळे श्रावणी विशाल- वर्ग-6वा- स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदीर अंबाजोगाई.
तृतीय:- कु. केंद्रे अंजली महादेव वर्ग 5 वा- वसंतराव काळे पब्लिक स्कूल अंबाजोगाई. उत्तेजनार्थ कु. अहिल्या अब्दुल्ला अनवरी- वर्ग – 5 वा मिलिखा हायस्कुल अंबाजोगाई
उत्तेजनार्थ :- कु. बडे प्रज्ञा शालीग्राम वर्ग 7 वा- प्रमोदजी महाजन न्यु इंग्लिश स्कुल, अंबाजोगाई
उत्तेजनार्थ :- कु. ईश्वरी बाळकृष्ण पवार वर्ग-6वा- सरस्वती पब्लीक स्कुल अंबाजोगाई
स्मरण चित्र स्पर्धा:- प्रथम- 1) कु. अपर्णा वैजनाथ कराड, वर्ग 8 वा- प्रमोदजी महाजन न्यु इंग्लिश स्कुल, अंबाजोगाई
द्वितीय- 2) चि. निखिल बाबुराव नाईक वर्ग-10- व्यंकटराव डावळे विद्यालय, अंबाजोगाई
तृतीय- 3) चि. विजय विठ्ठल पवार वर्ग 10 वी खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई.
4) उत्तेजनार्थ- कु. अमृता विकास औताडे- वर्ग 10 वा श्री. खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई.
5) उत्तेजनार्थ- कु. मथुरा महेश देशमुख- वर्ग 8 वा श्रीमती गोदावरीबाई कुंकूलोळ योगेश्वरी विद्यालय, अंबाजोगाई
6) उत्तेजनार्थ- कु. शेख रमशा सदाफ शेख- वर्ग 10 वा- मोहम्मद इकबाल हायस्कुल अंबाजोगाई.
दिव्यांग चित्रकला स्पर्धा-
================
प्रथम:- चि. बहिरे अमर सोमनाथ- ज्ञान वर्धिनी मूकबधीर विद्यालय, अंबाजोगाई
द्वितीय:- चि. शिंदे सार्थ ज्ञानेश्वर- ज्ञान वर्धिनी मूकबधीर विद्यालय, अंबाजोगाई
तृतीय- चि. कांदे दिपक विष्णु- ज्ञान वर्धिनी मूकबधीर विद्यालय, अंबाजोगाई
उत्तेजनार्थ- कु. अंशिका विजय हातागळे- ज्ञान वर्धिनी मूकबधीर विद्यालय, अंबाजोगाई
स्मरण चित्र स्पर्धा विजेता-
प्रथम- अभिषेक चव्हाण- मानव विकास निवासी विद्यालय,अंबाजोगाई.
द्वितीय- चि. गुट्टे गणेश चंद्रकांत- मानव विकास निवासी विद्यालय, अंबाजोगाई.
तृतीय- कु. आशाबी गुलाब शेख- मानव विकास निवासी विद्यालय, अंबाजोगाई.
उत्तेजनार्थ- कु. खांडेकरर वैष्णवी – कै.पू.बाबासाहेब परांजपे निवासी विद्यालय, अंबाजोगाई
विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र देवुन सन्मान करण्यात आला. सहभागी सर्व सात हजार विद्यार्थ्यांना समारोह समितीच्या वतीने सहभाग प्रमाण पत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षक प्रकाश मेंढे यांनी तर आभार प्रदर्शन राजेखाँ पठाण यांनी केले होते. शालेय चित्रकला स्पर्धाचे नियोजन क्रांतीसिंह नाना पाटील विद्यालय, येल्डाच्या सर्व शिक्षक वृंदांनी केले होते.
बालआनंद मेळावा-
आपल्या अंगी असलेल्या कला गुणांचा पाया मजबूत करावा- प्रा.विनय आर.आर.
================
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहातील बाल आनंद मेळाव्यास उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुण्यातील प्रा.विनय आर.आर. यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक कथा सांगुन विज्ञानाचे महत्त्व अनन्य साधारण असून, पंचेन्द्रीय हे प्रत्येकाच्या चेह-यावरच असतात जेवणाच्या एका घासातूनच आपणास पंचेन्द्रीय चा अनुभ्व येत असतो. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कला गुणांना प्राधान्य देत शालेय शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी सहशिक्षक युवराज माने, भुजंगराव माने व सचिव दगडुदादा लोमटे उपस्थित होते. कै.व्यंकटराव डावळे विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबुराव जगताप यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षक शरद लंगे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
=========================
Comments
Post a Comment