परळी तालुक्यात अंकुश गरड या तरूण शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या


कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेले शेतकरी अंकुश गरड यांच्या कुटुंबियांचे सामाजिक कार्यकर्ते ॲड.माधव जाधव यांनी केले सांत्वन

========================

परळी वैजेनाथ (विशेष प्रतिनिधी)

तालुक्यातील कौठळी येथील अंकुश गरड या तरूण शेतकऱ्यानी कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली असून त्या कुटुंबाची सुप्रसिद्ध विधीज्ञ तथा समाजसेवक ॲड.माधव जाधव यांनी भेट घेऊन गरड कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन याप्रसंगी माधव जाधव यांनी दिले. परळी तालुक्यात व बीड जिल्ह्यात सातत्याने शेतकरी आत्महत्याचं सत्र चालूच असून कौठळी येथे अंकुश गरड या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. मुळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत व काही अडचण असेल तर बोलून दाखविली पाहिजे ज्यातून मार्ग काढता येईल. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत असे आवाहन याप्रसंगी ॲड.माधव जाधव यांनी केले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवाकराम जाधव, तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, तालुका उपाध्यक्ष भागवत जाधव, मराठा सेवा संघाचे गंगाराम अण्णा जाधव, मंचकराव गरड, गोपाळ शिंगाडे, उत्तम गरड ,बळीराम गरड, सर्जेराव गरड यांच्यासह उपस्थित गावकरी उपस्थित होते.


=======================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)