अंबाजोगाई येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावणार - आ.सतीश भाऊ चव्हाण

अंबाजोगाई येथे विद्यापीठ सिनेट निवडणूकीतील उत्कर्ष




पॅनेलच्या प्रचारार्थ पदवीधर मेळावा संपन्न ; परीसरातील पदवीधरांची मोठी उपस्थिती

========================

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

आज अंबाजोगाई येथे उत्कर्ष पॅनेलच्या वतीने आ.सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदवीधर मेळावा आयोजित करण्यात आला. अंबाजोगाई परीसरातील पदवीधरांची मोठी उपस्थिती होती. यावेळी आ.सतीश चव्हाण यांनी डॉ.नरेंद्र काळे यांच्या विद्यापीठातील कामाचे कौतुक केले व भविष्यात विद्यापीठाचे उपकेंद्र अंबाजोगाई येथे करण्यासाठी सर्व ताकद लावु असे आश्वासन दिले. यावेळी मुप्टा संघटनेचे अध्यक्ष प्रा.सुनील मगरे, प्रा.मुंजा धोंडगे, प्राचार्य डॉ.बाबासाहेब गोरे, प्राचार्य अखिला गौस  व आ.सतीश भाऊ चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या निवडणुकीतील उमेदवार व मावळते व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.नरेंद्र काळे यांनी प्रास्ताविक केले. त्यावेळी डॉ.नरेंद्र काळे यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा आढावा मांडला व पुन्हा विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी आ.पृथ्विराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड.राजेश्वर चव्हाण, उत्कर्ष पॅनेलचे उमेदवार अ‍ॅड.सुभाष राऊत, अ‍ॅड. दत्तात्रय भांगे, प्राचार्य डॉ.गौतम पाटील, माजी प्राचार्य वनमाला रेड्डी, प्राचार्य श्रीधर भवर, प्रा.संजय कांबळे, माजी सिनेट सदस्य प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, गोविंदराव देशमुख, अमर देशमुख, प्राचार्य अरूण दळवे, संतोष सावरगावकर, रणजित मस्के, योगेश कदम, अ‍ॅड.शिवाजी कांबळे, डॉ.पी.एल.कराड, प्राचार्य कोळेकर सर इ. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. परीसरातील पदवीधर, शिक्षक, प्राध्यापक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन सौ.ज्योती शिंदे यांनी केले.


================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)