‘अभाविप’च्या राष्ट्रीय मंत्रिपदी अंकिता पवार यांची निवड

अंकिता पवार यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत

=========================


छञपती संभाजीनगर (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)  

देशातील सर्वांत मोठी विद्यार्थ्यांची संघटना अशी ओळख असणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय मंत्रिपदी अंकिता पवार यांची निवड करण्यात आली आहे.



अंकिता पवार यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडविलेले आहेत. हि निवड आपल्या कामाची पावती असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. अंकिता पवार या मुळच्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील कार्यकर्त्या आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य, प्रदेश सहमंत्री, प्रदेश मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या जयपूर येथील राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय मंत्रिपदी अंकिता पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नविन दायित्वा बद्दल अंकिता पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)