ब्रेकिंग न्युज : पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर 15 डिसेंबर 2022 पर्यंत करता येतील अर्ज
ब्रेकिंग न्युज : पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर 15 डिसेंबर 2022 पर्यंत करता येतील अर्ज
=======================
मुंबई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.
15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस भारती 2022: पोलीस भरती 2022 नवीन अपडेट्स. ताज्या बातमीनुसार, पोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी आता 15 दिवसांची मुदत वाढविण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.
•
तसेच आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
• राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
• अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.
========================
Comments
Post a Comment