Posts

Showing posts from February, 2024

वार्ता समूहाने गुणिजणांच्या कार्याचे कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप दिली - रणजितसिंह डिसले

Image
वार्ता समूहाने गुणिजणांच्या कार्याचे कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप दिली - रणजितसिंह डिसले अंबाजोगाईत वार्ता समूहाचा सोळावा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न ============================= संपादक - रणजित डांगे  अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) गेल्या 16 वर्षापासून सातत्याने सामान्य जणांच्या प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या वार्ता समूहाचा 16 वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह नगरपरिषद अंबाजोगाई या ठिकाणी शनिवार, दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व हर्षोउल्हासात संपन्न झाला. गेल्या 16 वर्षापासून सातत्याने सामान्य जणांच्या प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या वार्ता समूहाचा 16 वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह नगरपरिषद अंबाजोगाई या ठिकाणी शनिवार, दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व हर्षोउल्हासात संपन्न झाला. यावेळी जगातील सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार प्राप्त रणजित सिंह डिसले गुरूजी यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे कौतुक करून काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव आणि कौतुक केले तर त्यांना प्रोत्साहन मिळत असते....

संकल्प विद्यामंदिर शाळेने गुणवत्तापूर्ण शाळा अशी स्वतःची ओळख निर्माण केली - शिक्षणतज्ज्ञ प्रा.शिवराज मोटेगावकर

Image
संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या "सुवर्णरत्न" पुरस्काराने अभिजीत जगताप, मुख्तार शेख, सुकुमार देशमुख आणि कल्पना देशपांडे सन्मानित =============================== संपादक - रणजित डांगे  अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) येथील संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणा-या "सुवर्णरत्न" पुरस्कारांचे वितरण यावर्षी रविवार, दि.25 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले. यावर्षी हे पुरस्कार अभिजीत जगताप (पत्रकारिता), मुख्तार शेख (सामाजिक), सुकुमार देशमुख (शिक्षण) आणि कल्पना देशपांडे (कला) यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. रविवारी आद्यकवी मुकूंदराज सांस्कृतिक सभागृहात हा अत्यंत दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलताना प्रा.शिवराज मोटेगावकर म्हणाले की, अंबाजोगाई शहर हे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. संकल्प विद्या मंदिरने शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेचा पॅटर्न निर्माण केला आहे. हे सभागृहातील पालकांची मोठी गर्दी पाहून लक्षात येते, शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, असे वंदनिय महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, आम्ह...

महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Image
यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर मल्लिकार्जुनप्पा बिडवे, सचिव मन्मथप्पा पांडबप्पा लोखंडे यांनी केले अभिनंदन ======================= संपादक - रणजित डांगे  अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निक कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव शनिवार, दिनांक २४ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या अंबाजोगाई येथील टी.बी.गिरवलकर पॉलीटेक्निक कॉलेज मध्ये शनिवार,दि.२४ फेब्रुवारी रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे वतीने अध्यक्ष शिवशंकर मल्लिकार्जुनप्पा बिडवे, सचिव मन्मथप्पा पांडबप्पा लोखंडे यांनी अभिनंदन केल्याची माहिती प्राचार्य सुदीप शाहूराव झिरमिरे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी सेमिस्टर परीक्षांमध्ये विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथी यशवंत आरसुडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यात तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग - प्रथम- ओम संजय बुरांडे (94.11 टक्के), द्वितीय...

सुप्रसिद्ध कथाकार उमेश मोहिते यांच्या खोडा कथासंग्रहास शिवांजली साहित्यपीठाचा पुरस्कार जाहीर

Image
सुप्रसिद्ध कथाकार उमेश मोहिते यांच्या खोडा कथासंग्रहास शिवांजली साहित्यपीठाचा पुरस्कार जाहीर उमेश मोहिते यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन ================================== संपादक - रणजित डांगे  अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) येथील प्रसिद्ध लेखक उमेश मोहिते यांच्या खोडा या कथासंग्रहाला शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा चाळकवाडी (जि.पुणे) यांच्यामार्फत दिला जाणारा स्व.बबनराव मटाले स्मृती कथा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख २०००/- रूपये असे असून पुरस्कार वितरण सोमवार, दि.२६ फेब्रुवारी रोजी आयोजित ३१ व्या राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सवात मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहे. उमेश मोहिते हे इंग्रजी विषयाचे सेवानिवृत्त अध्यापक असून त्यांची कथा, बाल कथा आणि कादंबरी अशी नऊ पुस्तके आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत. तसेच त्यांना महाराष्ट्रातील विविध साहित्य संस्थांचे आठ प्रतिष्ठा प्राप्त राज्यस्तरीय पुरस्कार ही प्राप्त झालेले असून त्यांचे लेखन विद्यापीठीय अभ्यासक्रमात ही समाविष्ट झालेले आहे. शिवाय त्यांनी मस...

ॲड.माधव जाधव यांच्या सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या कार्याचे सर्वस्तरांतून स्वागत

Image
तळेगाव घाट येथील श्रुतिका यादव या विद्यार्थिनीस ॲड.माधव जाधव यांनी दिला मदतीचा हात ॲड.माधव जाधव यांच्या सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या कार्याचे सर्वस्तरांतून स्वागत ======================= संपादक - रणजित डांगे  अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) तालुक्यातील तळेगाव घाट येथील श्रुतिका यादव या डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थिनीस ॲड.माधव जाधव यांनी मदतीचा हात दिला. त्याबद्दल ॲड.जाधव यांच्या सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या कार्याचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे. परळी विधानसभा मतदारसंघातील तळेगाव घाट (ता.अंबाजोगाई, जि.बीड) येथील श्रुतिका जगदीशराव यादव ही विद्यार्थिनी सध्या लातूर येथे नीट या परीक्षेची तयारी करीत आहे. श्रुतिका यादव या मुलीचे आई - वडील मोलमजुरी करून मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मुलीच्या शिक्षणामध्ये अडचण येत आहे व श्रुतिका यादव ही तिचे स्वप्न पूर्ण करण्यास असमर्थ ठरत आहे. ही बाब ॲड.माधव जाधव यांना समजल्यानंतर ॲड.माधव जाधव यांनी श्रुतिका यादव हिच्या पुढील शिक्षणासाठी दहा हजार र...

छत्रपती शिवाजी महाराजांना जय जवान आजी - माजी सैनिक संस्थेकडून अभिवादन

Image
छत्रपती शिवाजी महाराजांना जय जवान आजी - माजी सैनिक संस्थेकडून अभिवादन ============================== संपादक - रणजित डांगे  अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) भारतीय सैन्य दलात कार्यरत राहून आपल्या प्राणाची बाजी लावून, प्रसंगी परकीय शक्तींना आस्मान दाखवून देशाचे रक्षण करणारे जवान हे भारतमातेचे भूषण असतात. अशा वीर सैनिकांचा ज्या, त्या गावांना मोठा अभिमान असतो. अशाच जय जवान आजी - माजी सैनिक संस्थेतील जवानांच्या शुभ हस्ते शिवध्वजारोहण करून अंबाजोगाईत सोमवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.   अंबाजोगाई शहरात मागील काही वर्षांपासून शिवजन्मोत्सव सोहळा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दिवंगत सुनिलकाका लोमटे यांच्या प्रेरणेतून जयंती उत्सव समितीचे प्रमुख रणजित लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली व कृष्णा सुनिलराव लोमटे यांच्या पुढाकाराने यावर्षी ही विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. परंतु, सुनिलकाकांच्या आठवणीने शिवप्रेमी व्याकुळ झाल्याचे दिसून आले. सोमवारी शिवजन्मोत्सवानिमीत्त सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे...

स्वाराती मधील बंद यंत्रसामुग्री सुरू करून दर्जेदार रूग्णसेवा द्या - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार यांची मागणी

Image
स्वाराती मधील बंद यंत्रसामुग्री सुरू करून दर्जेदार रूग्णसेवा द्या - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार यांची मागणी स्वाराती रूग्णालयाचे अधिष्ठाता यांना माजी आमदार पृथ्विराज साठे व तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांचे निवेदन ================================ संपादक - रणजित डांगे  अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) ग्रामीण आरोग्य सेवेला वरदान ठरलेल्या येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील बंद यंत्रसामुग्री सुरू करून सामान्य लोकांना तसेच गरजू रूग्णांना दर्जेदार रूग्णसेवा द्यावी. कारण, स्वाराती रूग्णालयात राज्यासह मराठवाड्याच्या विविध भागातून सर्वसामान्य लोक तसेच गरजू रूग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येतात. तेव्हा त्यांना न्याय द्यावा याबाबत माजी आमदार पृथ्विराज साठे व तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता यांना गुरूवार, दिनांक १५ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनातून एकूण ८ मागण्या केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाने स्वामी रामानंद तीर्थ श...

व्हॅलेंटाईन डे विशेष : प्रेम म्हणजे आकर्षण नव्हे, तर समर्पण होय ; केशरताई व गुलाबराव सिरसट यांच्या प्रेमाची गोष्ट

Image
व्हॅलेंटाईन डे विशेष : प्रेम म्हणजे आकर्षण नव्हे, तर समर्पण होय ; केशरताई व गुलाबराव सिरसट यांच्या प्रेमाची गोष्ट ========================== " त्या दोघांची आरोग्य खात्यात नौकरी. नौकरीच्या निमित्ताने सतत संपर्क वाढला आणि त्यातून नकळत दोघांना एकमेकांची ओढही निर्माण झाली. पुढे त्यांनी आपल्या विचारांशी ठाम राहत. निर्णय घेतला. ते दोघे एकत्र आले. त्यांनी विवाह केला. एक आदर्श, सुखी आणि समाधानी कुटुंब म्हणून त्यांची समाजात सर्वदूर ओळख आहे. ही गोष्ट आहे केशरताई व गुलाबराव सिरसट यांच्या अतुट प्रेमाची. त्यागाची, समर्पणाची, विश्वासाची, परस्परांबद्दल आदराची भावना जी आजच्या नव्या पिढीला ही माहिती झाली पाहिजे, यासाठी खास व्हॅलेंटाईन - डे निमित्त आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. केशरताई व गुलाबराव सिरसट यांच्या समर्पित प्रेमाची आठवण करून देणारा आनंददायी जीवनप्रवास..." ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीचे असताना देखील परिस्थितीवर मात करून ते दोघे ही उच्च शिक्षित झाले. नौकरीच्या निमित्ताने त्यांच्यात मैत्री झाली. गुलाबराव सिरसट यांना सांस्कृतिक कार्यक्रमांतून पोव...

चांदापुर येथे १० फेब्रुवारी रोजी १० व्या धम्म परिषदेचे आयोजन

Image
चांदापुर येथे १० फेब्रुवारी रोजी १० व्या धम्म परिषदेचे आयोजन धम्म उपासकांनी सहभागी व्हावे - स्वागताध्यक्ष ऍड.अनंतराव जगतकर यांचे आवाहन ================================== संपादक : रणजित डांगे  अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर (तिर्थक्षेत्र दर्जा - क प्राप्त) येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही शनिवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी दहाव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेला पुज्य डॉ.भदन्त उपगुप्त महाथेरो (पुर्णा) यांच्या मार्गदर्शनाखाली पुज्य डॉ.भदन्त महाविरो (काळेगाव), पुज्य भदन्त पय्यानंद (लातूर) आणि पुज्य भिक्खू धम्मशील थेरो (हिंगोली / बीड) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी, चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. या धम्म परिषदेचे " सम्यक संकल्प " या पेजवरून फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याचा लाभ धम्म उपासकांनी घ्यावा असे आवाहन पुज्य भिक्खु धम्मशील थेरो, धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष ऍ...

लोकनेते मुंडे साहेबांमुळेच माझे जीवन घडले - उद्योजक विवेक देशपांडे यांचे प्रतिपादन ; खोलेश्वर महाविद्यालयाचे स्नेह संमेलनाचे थाटात उद्घाटन

Image
लोकनेते मुंडे साहेबांमुळेच माझे जीवन घडले - उद्योजक विवेक देशपांडे यांचे प्रतिपादन  खोलेश्वर महाविद्यालयाचे स्नेह संमेलनाचे थाटात उद्घाटन  -------------------------------------------------------------- संपादक : रणजित डांगे  अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्या जीवनाची दिशा ठरवणे महत्वाचे असुन आयुष्यात काय व्हायचं आहे ? याची निश्चिती करून अजेंडा डोळ्यांसमोर ठेवला तर त्यासाठी कठोर परिश्रम घेण्यासाठी मागे पडता कामा नये, योग्य संधी निश्चित येवु शकते, त्यासाठी आत्मानंद आणि स्वत्व शोधण्याचा प्रयत्न केला तर यशाची गुरूकिल्ली खऱ्या अर्थाने सकारात्मकता होय. क्रिएटिव्ह माइंड नेहमी माणसाला आनंद देवून उत्साह भरवते. नकारात्मकते मध्ये सकारात्मकता जर शोधली तर केलेला संकल्प सिद्धीस जावू शकतो असे प्रतिपादन संभाजीनगर येथील प्रसिद्ध उद्योगपती विवेक देशपांडे यांनी केले. मी आयुष्यात शुन्य होतो. पण, याच कर्मभुमीत स्व.गोपीनाथराव मुंडे यांचा लाभलेला परिसस्पर्श जीवनाच्या उद्धारासाठी कारणीभुत ठरला हे सांगायला देशपांडे विसरले नाहीत. खोलेश्वर महाविद्यालयाच्य...

अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय 'मूकनायक' पुरस्कार 'साम' टीव्हीच्या सोनाली शिंदे यांना दिमाखदार सोहळ्यात प्रदान

Image
माध्यमं मुकी झाल्याने सोशल मिडियाचा प्रभाव वाढला आहे : सोनाली शिंदे अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय 'मूकनायक' पुरस्कार 'साम' टीव्हीच्या सोनाली शिंदे यांना दिमाखदार सोहळ्यात प्रदान =============================== संपादक : रणजित डांगे  अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. माध्यमांवर प्रस्थापितांचे वर्चस्व वाढल्याने सत्य काय ? किंवा वास्तव काय ? हे माध्यमांना सांगता येत नाही. परंतू, त्यामध्ये काम करणारे प्रामाणिक पत्रकार असले तरी त्यांची केवळ घालमेल आहे. शिवाय विद्यमान परिस्थितीत माध्यमं मुकी झाल्याने सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. समाजाचे खरे चित्र या माध्यमातून पुढे येऊ लागले आहे, असे मत 'साम' टीव्ही मराठीच्या वृत्तनिवेदिका सोनाली शिंदे यांनी व्यक्त केले. अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय 'मूकनायक' पुरस्कार वितरण व 'मूकनायक' दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने बुधवार दिनांक 31 जानेवारी रोजी 'मूकनायक' दिनानिमित...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) च्या केज विधानसभा कार्याध्यक्षपदी मीर तारेख अली उस्मानी यांची नियुक्ती

Image
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) च्या केज विधानसभा कार्याध्यक्षपदी मीर तारेख अली उस्मानी यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष आ.संदिप क्षीरसागर यांनी दिले नियुक्तीपत्र ; मान्यवर नेते उपस्थित ================================ संपादक : रणजित डांगे  बीड (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) येथील अनुभवी, पुरोगामी विचार जोपासणारे अभ्यासू नेते मीर तारेख अली उस्मानी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) च्या बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उस्मानी यांना जिल्हाध्यक्ष आमदार संदिप क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी बुधवारी नियुक्तीपत्र दिले. यावेळी बीड जिल्ह्यातील पक्षाचे मातब्बर आणि मान्यवर नेते उपस्थित होते. मीर तारेख अली उस्मानी यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या केज विधानसभा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात य...