ॲड.माधव जाधव यांच्या सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या कार्याचे सर्वस्तरांतून स्वागत

तळेगाव घाट येथील श्रुतिका यादव या विद्यार्थिनीस ॲड.माधव जाधव यांनी दिला मदतीचा हात

ॲड.माधव जाधव यांच्या सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या कार्याचे सर्वस्तरांतून स्वागत

=======================

संपादक - रणजित डांगे 

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

तालुक्यातील तळेगाव घाट येथील श्रुतिका यादव या डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थिनीस ॲड.माधव जाधव यांनी मदतीचा हात दिला. त्याबद्दल ॲड.जाधव यांच्या सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या कार्याचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.


परळी विधानसभा मतदारसंघातील तळेगाव घाट (ता.अंबाजोगाई, जि.बीड) येथील श्रुतिका जगदीशराव यादव ही विद्यार्थिनी सध्या लातूर येथे नीट या परीक्षेची तयारी करीत आहे. श्रुतिका यादव या मुलीचे आई - वडील मोलमजुरी करून मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मुलीच्या शिक्षणामध्ये अडचण येत आहे व श्रुतिका यादव ही तिचे स्वप्न पूर्ण करण्यास असमर्थ ठरत आहे. ही बाब ॲड.माधव जाधव यांना समजल्यानंतर ॲड.माधव जाधव यांनी श्रुतिका यादव हिच्या पुढील शिक्षणासाठी दहा हजार रूपये (10,000/-) रोख आर्थिक मदत करून तिला आधार दिला. तसेच या पुढील शिक्षणासाठी लागेल ती मदत करण्याची हमी ॲड.माधव जाधव यांनी दिली. यावेळी योग गुरु इंजिनियर परमेश्वर भिसे व तसेच श्रुतिका यादवचे वडील जगदीशराव यादव उपस्थित होते.


=======================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड