राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) च्या केज विधानसभा कार्याध्यक्षपदी मीर तारेख अली उस्मानी यांची नियुक्ती
जिल्हाध्यक्ष आ.संदिप क्षीरसागर यांनी दिले नियुक्तीपत्र ; मान्यवर नेते उपस्थित
================================
संपादक : रणजित डांगे
बीड (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
येथील अनुभवी, पुरोगामी विचार जोपासणारे अभ्यासू नेते मीर तारेख अली उस्मानी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) च्या बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उस्मानी यांना जिल्हाध्यक्ष आमदार संदिप क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी बुधवारी नियुक्तीपत्र दिले. यावेळी बीड जिल्ह्यातील पक्षाचे मातब्बर आणि मान्यवर नेते उपस्थित होते.
मीर तारेख अली उस्मानी यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या केज विधानसभा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे. आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या विकासांत आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना अधिक मजबुतीने उभी कराल ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सदरील नियुक्तीबद्दल समाजाच्या सर्वस्तरांतून उस्मानी यांचे स्वागत व अभिनंदन होत आहे. मीर तारेख अली उस्मानी यांनी आपली राजकीय कारकीर्द अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सन १९९५ सालापासून सुरू केली. प्रारंभी ते अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना १९९५ साली सध्याच्या छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या एनएसयुआयचे पदाधिकारी झाले. सन १९९८ साली ते काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष झाले. १९९९ ते २०१७ या कालावधीत तब्बल १८ वर्षे सलग त्यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अंबाजोगाई शहराध्यक्षपद भुषविले. बीड जिल्ह्यातील विविध निवडणुकीत त्यांनी निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच १० वर्षे स्वाराती शासकीय ग्रामीण वैद्यकीय रूग्णालय व महाविद्यालय कमिटीच्या सदस्यपदी, शासकीय दक्षता, पुरवठा विविध शासकीय कमिट्यांच्या माध्यमातून उस्मानी यांनी जनसेवा केली. त्यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य केल्याचा असा ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या याच सर्वांगिण कार्य, संघटन कौशल्य, प्रभावी जनसंपर्क आणि निष्ठेची दखल घेऊन मीर तारेख अली उस्मानी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) च्या बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उस्मानी यांच्या नियुक्तीमुळे अंबाजोगाई शहर, तालुक्यासह संपूर्ण केज विधानसभा मतदारसंघात पक्षाची ताकद वाढली आहे. उस्मानी यांना जिल्हाध्यक्ष आमदार संदिप क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी बुधवार, दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी नियुक्तीपत्र दिले. यावेळी बीड जिल्ह्यातील पक्षाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार उषाताई दराडे, बबनराव गित्ते, प्रा.सुशिलाताई मोराळे, सुदामतीताई गुट्टे, सुरेशतात्या पाटील यांच्यासह अंबाजोगाई येथील शेख रौफभाई, तानबा लांडगे, बालाजी शेरेकर, यशोधन लोमटे, भगवान ढगे, सुधाकर जोगदंड आदींसह बीड जिल्ह्यासह केज विधानसभा मतदारसंघातील मातब्बर आणि मान्यवर नेते, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकनेते खा.शरदचंद्र पवार यांचा विचार सर्वदूर पोहोचविणार :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर व माजी आमदार पृथ्वीराज साठे तसेच पक्षाचे सर्व प्रमुख नेते यांच्या नेतृत्वाखाली केज विधानसभा मतदारसंघाचा कार्याध्यक्ष म्हणून काम करताना सर्वांना सोबत घेऊन लोकनेते खा.शरदचंद्र पवार यांचा पुरोगामी विचार सर्वदूर पोहोचवणार आहे. आपल्या राजकीय अनुभवाचा फायदा पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत.
- मीर तारेख अली उस्मानी
(कार्याध्यक्ष, केज विधानसभा मतदारसंघ)
================================
Comments
Post a Comment