स्वाराती मधील बंद यंत्रसामुग्री सुरू करून दर्जेदार रूग्णसेवा द्या - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार यांची मागणी
स्वाराती मधील बंद यंत्रसामुग्री सुरू करून दर्जेदार रूग्णसेवा द्या - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार यांची मागणी
स्वाराती रूग्णालयाचे अधिष्ठाता यांना माजी आमदार पृथ्विराज साठे व तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांचे निवेदन
================================
संपादक - रणजित डांगे
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) ग्रामीण आरोग्य सेवेला वरदान ठरलेल्या येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील बंद यंत्रसामुग्री सुरू करून सामान्य लोकांना तसेच गरजू रूग्णांना दर्जेदार रूग्णसेवा द्यावी. कारण, स्वाराती रूग्णालयात राज्यासह मराठवाड्याच्या विविध भागातून सर्वसामान्य लोक तसेच गरजू रूग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येतात. तेव्हा त्यांना न्याय द्यावा याबाबत माजी आमदार पृथ्विराज साठे व तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता यांना गुरूवार, दिनांक १५ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनातून एकूण ८ मागण्या केल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाने स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता यांना दिलेल्या निवेदनात एकूण ८ मागण्यांचा समावेश आहे. त्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, अंबाजोगाई मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विविध मशिन व यंत्रसामुग्री बंद आहेत. त्यामुळे रूग्णांचे बरेच हाल होत आहेत. तरी पुढील बाबींची पूर्तता व्हावी १) जवळपास गेल्या दीड महिन्यांपासून सी.टी.स्कॅन मशीन बंद आहे. ती ताबडतोब सुरू करण्यात यावी., २) अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी हे मशिन स्थापित होवून अनेक महिने झाली. परंतु, ते मशीन सुरू न करता धूळ खात पडले आहेत. ते ताबडतोब सुरू करण्यात यावेत., ३) प्रसुती (डिलेव्हरी) झाल्यानंतर आवश्यकता असताना सुध्दा बालरोग तज्ज्ञ डॉक्टर थांबत नाहीत., ४) अपघात विभागामध्ये सीएमओ वेळेवर पेशंन्ट पहात नाहीत व सिनिअर डॉक्टर ही थांबत नाहीत., ५) ओ.पी.डी.मध्ये सर्व विभागप्रमुख स्वतः हजर नसतात., ६) कुठले ही ऑपरेशन वेळेवर होत नाही., ७) डायलिसिस मशीन बंद असल्यामुळे रूग्णांचे आतोनात हाल होत आहेत. ते मशीन तात्काळ सुरू करण्यात यावेत., ८) रूग्णालयात सेवा देण्यासाठी मनुष्यबळ व डॉक्टर हे कागदोपत्री दाखविले जातात. परंतु, प्रत्यक्ष रूग्णसेवेसाठी ते उपलब्ध नसतात. तरी या सदरील सर्व मागण्यांचा विचार करून तात्काळ बंद यंत्रसामुग्री सुरू करण्यात यावी. व सर्व स्टाफला ड्युटीला हजर राहण्याचे लवकरात लवकर आदेश देण्यात यावेत. या मागण्या करण्यात आल्या आहेत. अन्यथा येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा सदरील निवेदनातून देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाचे अंबाजोगाई व केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्विराज साठे व तालुकाध्यक्ष अमर दगडूसाहेब देशमुख यांच्यासह शेख रऊफ मसूद, संजिवनीताई देशमुख, तानबा लांडगे, हमीद चौधरी, सुधाकर जोगदंड, बालाजी शेरेकर, किरण पवार, रविंद्र मोरे, प्रशांत पवार, फैजान मिर्झा, इम्रान पठाण, वैभव पाटील, रामराव आडे, विनायक पवार, निखिल शिंदे, अंगद वाकडे, सुभाष वडमारे, सुरेश वाकडे, सुंदर काळे, धनराज सोनवणे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
स्वाराती मधील बंद मशीन सुरू करा : मागील दीड महिन्यांपासून सी.टी.स्कॅन मशीन बंद आहे. तसेच डायलिसिस मशीन ही बंद आहे, त्या ताबडतोब सुरू करण्यात याव्यात., अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी हे मशिन स्थापित होवून अनेक महिने झाली. परंतु, ते ही मशीन सुरू न करता धूळ खात पडल्या आहेत. त्याही ताबडतोब सुरू करण्यात याव्यात. आणि रूग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा द्यावी. - पृथ्विराज साठे (माजी आमदार, केज विधानसभा मतदारसंघ.)
स्वारातीत रूग्णांचे हाल : स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, अंबाजोगाई मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनेक मशिन व यंत्रसामुग्री या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे रूग्णांचे मोठे हाल होत आहेत. म्हणून सामान्य व गरजू लोकांना दिलासा द्या, आम्ही निवेदनातून केलेल्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा सर्वसामान्य जनता व गरजू रूग्णांच्या दर्जेदार आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. - अमर देशमुख (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार.)
================================
Comments
Post a Comment