चांदापुर येथे १० फेब्रुवारी रोजी १० व्या धम्म परिषदेचे आयोजन
धम्म उपासकांनी सहभागी व्हावे - स्वागताध्यक्ष ऍड.अनंतराव जगतकर यांचे आवाहन
==================================
संपादक : रणजित डांगे
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर (तिर्थक्षेत्र दर्जा - क प्राप्त) येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही शनिवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी दहाव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेला पुज्य डॉ.भदन्त उपगुप्त महाथेरो (पुर्णा) यांच्या मार्गदर्शनाखाली पुज्य डॉ.भदन्त महाविरो (काळेगाव), पुज्य भदन्त पय्यानंद (लातूर) आणि पुज्य भिक्खू धम्मशील थेरो (हिंगोली / बीड) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी, चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. या धम्म परिषदेचे " सम्यक संकल्प " या पेजवरून फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याचा लाभ धम्म उपासकांनी घ्यावा असे आवाहन पुज्य भिक्खु धम्मशील थेरो, धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष ऍड.अनंतराव जगतकर यांनी केले आहे.
तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन (ता.परळी, जि.बीड) यांच्या वतीने तालुक्यातील चोखामेळा सहकारी सोसायटी, वसंतनगर तांडा, मौजे चांदापूर, ता.परळी येथे शनिवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी येथे दहाव्या बौद्ध धम्म परिषदेची सुरूवात सकाळी ९ वाजता पंचरंगी धम्म ध्वजारोहणाने होईल. या धम्म परीषदेच्या स्वागताध्यक्षपदी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनीचे अध्यक्ष ऍड.अनंतराव जगतकर हे असणार आहेत. याप्रसंगी प्रा.डॉ.सुरेश वाघमारे (ज्येष्ठ विचारवंत, लातूर) यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सिताबाई बनसोडे (नगराध्यक्षा, केज), नालंदा अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर वडमारे, इंजि.अभिमन्यू चव्हाण (मा.कार्यकारी अभियंता, मराविम), इंजि.राजु बोबडे (उपकार्यकारी अभियंता, मराविम), माजी नगरसेवक प्रा.डॉ.विनोद जगतकर, प्रा.प्रदीप रोडे (प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था, बीड), डी.एस.राठोड (संस्थापक, नाईक सेवा शिक्षण प्रसारक मंडळ), त्रिंबक रोडे (प्रधान तंत्रज्ञ, मराविम), आनंद वाघमारे (धम्मसेवक, पट्टीवडगाव), मिलिंद नरबागे, प्रसिद्धीप्रमुख प्रा.बालाजी जगतकर, प्रा.विलास रोडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, ज्या उपासकांना धम्म परीषदेला उपस्थित रहावयाचे आहे. त्या धम्म उपासकांनी पांढरे वस्त्र परिधान करूनच धम्म परिषदेत सहभागी व्हावे तसेच वसंतनगर तांडा, चांदापूर ता.परळी वैजेनाथ या ठिकाणी धम्म परिषदेस येताना पुस - नंदागौळ - वसंतनगर तांडा मार्गेच यावे. असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. धम्म परिषदेच्या यशस्वितेसाठी तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन (ता.परळी वै. जि.बीड) चे पदाधिकारी चंद्रकांत इंगळे, प्रा.प्रदीप रोडे, राजेंद्र घोडके, राहुल घोडके, प्रा.गौतम गायकवाड, व्यंकट वाघमारे, सचिन वाघमारे, जगन सरवदे, विश्वनाथ भालेराव, सीमाताई इंगळे हे प्रयत्न करीत आहेत. तर चांदापुर येथे १० व्या बौध्द धम्म परीषदे निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमास या विभागातील उपासकांनी मोठ्या संख्येने सहभागी असे आवाहान करण्यात आले आहे
================================
Comments
Post a Comment