सुप्रसिद्ध कथाकार उमेश मोहिते यांच्या खोडा कथासंग्रहास शिवांजली साहित्यपीठाचा पुरस्कार जाहीर
सुप्रसिद्ध कथाकार उमेश मोहिते यांच्या खोडा कथासंग्रहास शिवांजली साहित्यपीठाचा पुरस्कार जाहीर
उमेश मोहिते यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन
==================================
संपादक - रणजित डांगे
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
येथील प्रसिद्ध लेखक उमेश मोहिते यांच्या खोडा या कथासंग्रहाला शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा चाळकवाडी (जि.पुणे) यांच्यामार्फत दिला जाणारा स्व.बबनराव मटाले स्मृती कथा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख २०००/- रूपये असे असून पुरस्कार वितरण सोमवार, दि.२६ फेब्रुवारी रोजी आयोजित ३१ व्या राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सवात मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहे. उमेश मोहिते हे इंग्रजी विषयाचे सेवानिवृत्त अध्यापक असून त्यांची कथा, बाल कथा आणि कादंबरी अशी नऊ पुस्तके आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत. तसेच त्यांना महाराष्ट्रातील विविध साहित्य संस्थांचे आठ प्रतिष्ठा प्राप्त राज्यस्तरीय पुरस्कार ही प्राप्त झालेले असून त्यांचे लेखन विद्यापीठीय अभ्यासक्रमात ही समाविष्ट झालेले आहे. शिवाय त्यांनी मसाप शाखा माजलगावच्या वतीने नित्रुड (ता.माजलगाव) येथे फेब्रुवारी २०१५ मध्ये आयोजित केलेल्या ७ व्या शिवार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही भुषवलेले आहे. या यशाबद्दल साहित्यिक मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
==================================
Comments
Post a Comment