वार्ता समूहाने गुणिजणांच्या कार्याचे कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप दिली - रणजितसिंह डिसले
वार्ता समूहाने गुणिजणांच्या कार्याचे कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप दिली - रणजितसिंह डिसले
अंबाजोगाईत वार्ता समूहाचा सोळावा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न
=============================
संपादक - रणजित डांगे
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
गेल्या 16 वर्षापासून सातत्याने सामान्य जणांच्या प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या वार्ता समूहाचा 16 वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह नगरपरिषद अंबाजोगाई या ठिकाणी शनिवार, दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व हर्षोउल्हासात संपन्न झाला.
गेल्या 16 वर्षापासून सातत्याने सामान्य जणांच्या प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या वार्ता समूहाचा 16 वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह नगरपरिषद अंबाजोगाई या ठिकाणी शनिवार, दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व हर्षोउल्हासात संपन्न झाला.
यावेळी जगातील सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार प्राप्त रणजित सिंह डिसले गुरूजी यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे कौतुक करून काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव आणि कौतुक केले तर त्यांना प्रोत्साहन मिळत असते. पाठीवर शाबासकीची थाप दिली तर दहा हत्तींचे बळ मिळत असतं म्हणून सामाजिक स्तरांवर अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत डिसले यांनी व्यक्त केले. वार्ता समूहाचा नगरभूषण पुरस्कार चंद्रपूर येथील मुख्य न्याय दंडाधिकारी प्रशांत कुलकर्णी, सद्भावना पुरस्कार घाटनांदुर येथील गुरूदास सेवाश्रम, युवा गौरव पुरस्कार परभणी येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब,तर यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण ठरलेल्या अभिनव अरूणराव पत्की यांच्यासह विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. प्रारंभी मातोश्री दिवंगत द्रोपदीबाई गित्ते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून दीपप्रज्कज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई पीपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी हे होते. तर प्रमुख आकर्षण म्हणून ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जगातील सर्वोत्तम शिक्षक हा पुरस्कार व सन्मान मिळाला आहे असे रणजीतसिंह डिसले गुरुजी उर्फ ग्लोबल गुरूजी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून केजच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड, जनविकास परिवर्तन आघाडी केजचे संस्थापक हारूण भाई इनामदार, आयएमए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे, सेलू जिल्हा परभणी येथील सहनिबंधक सतीश बनसोडे, केडीएस कोचिंग क्लासेस चे संचालक प्रा. शिवसागर सर, अंबाजोगाईतील उद्योजक प्रताप पवार, केज येथील साने गुरूजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविताताई कराड यांच्यासह नगरभूषण पुरस्कार प्राप्त न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी, सद्भावना पुरस्कार प्राप्त नामदेव महाराज दहिवाळ, युवा गौरव पुरस्कार प्राप्त इंजि.प्रसाद लांब, यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेले अभिनव पत्की आणि वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक करताना संपादक परमेश्वर गित्ते म्हणाले की, वार्ता समूहाने सातत्याने समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील काम करणाऱ्या चेहऱ्यांना शोधून त्यांचा सन्मान व कौतुक करण्याची भूमिका घेतली आहे. अंबाजोगाई शहराचे व तालुक्याचे नांव जो उज्वल करेल तो सत्कारास आणि सन्मानस पात्र आहे.अशा कर्तुत्वानांचा सत्कार करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे संपादक परमेश्वर गित्ते यांनी सांगितले तर यावेळी नगरभूषण पुरस्कार प्राप्त न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी म्हणाले की, माझ्या कर्मभूमीत माझा सन्मान होतोय यापेक्षा कुठलाही पुरस्कार व सत्कार माझ्यासाठी सर्वोच्च नाही. या शहराने मला चांगले शिक्षण दिले, संस्कार दिले .या शहरामुळे माझ्या जीवनात परिवर्तन झाले. न्यायालयीन काम करताना अनेक बंधने असतात त्याचे पालन करून वाटचाल करावी लागते. अनेक प्रकरणे समोर येतात काही प्रकरणे गुंतागुंतींचे तर काही प्रकरणे क्लिष्ट असतात .त्यातून साक्षी पुराव्याद्वारे निकाल द्यावा लागतो. अनेक प्रकरणे पाहिली तर पोटात गोळा उठतो तर काही प्रकरणात कठोर निर्णय घ्यावा लागतो. एका प्रकरणात एका बाळाला 65 डागण्या दिलेल्या होत्या तो निकाल देताना मनाची घालमेल होती असे अनेक प्रकरणे सांगून उपस्थितांच्या मनाला गहिवरून आले. न्यायदाना सोबतच अनेकांना मदत करीत असतो. या सोबतच मी माझे छंद जोपात जोपासत असतो. मुंबई मध्ये भजनी मंडळात जाऊन रममान होतो. असे सांगत अनेक आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुशराव शिंदे यांनी व्हिडिओद्वारे सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि अंबाजोगाईकरांना शुभेच्छा देऊन वार्ता समूहाच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना अंबाजोगाई पीपल बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की, अंबाजोगाई शहरात गेल्या सोळा वर्षांपासून वार्ता समूहाचा स्तुत्य उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नेतृत्वाला प्रोत्साहन मिळत आहे. कर्मभूमीच्या वतीने केला जाणारा सन्मान हा इतर पुरस्कारांपेक्षा व सत्कार यापेक्षा अति उच्च असतो. अंबाजोगाई तालुक्यातील असंख्य गुणवंत, प्रज्ञावंत, यशवंत मंडळी ही जगाच्या नकाशावर चांगलं काम करते आहे. त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला उजाळा देऊन या ठिकाणी सन्मान केला जात असल्याचे राजकिशोर मोदी यांनी सांगितले. तर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले ग्लोबल गुरूजी अर्थात ग्लोबल टीचर्स अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले गुरूजी म्हणाले की, मी अनेक ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो सन्मान झाले, कौतुक झाले. पण, असा भावस्पर्शी सोहळा कधी पाहिला नाही. कारण, वार्ता समूहाने जो समाजाप्रती चांगुलपणा दाखवला तो नक्कीच कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. आपण करीत असलेल्या कामाकडे कोणाची नजर आहे. हे या निमित्ताने लक्षात येते आणि कामाची गती वाढते अशा उपक्रमामुळे सामाजिक स्थैर्य निर्माण व्हायला मदत होते. शिवाय यावेळी डिसले गुरूजी यांनी विद्यार्थी व पालक यांच्या नात्याची गुंफण आणि नात्यातील वास्तविकता याचे सुंदर विवेचन केले. यावेळी ते म्हणाले की, समाजामध्ये काम करीत असताना आपण आपल्या मुलांकडे ज्या प्रमाणात किंवा ज्या पद्धतीने लक्ष देतो त्या प्रकारचे लक्ष अमेरिकेसारख्या पाश्चिमात्य राष्ट्रात दिले जात नाही. वयाची 18 वर्षे पार केल्यानंतर त्या मुलांना स्वावलंबी होण्यासाठी घरातून बाहेर काढले जाते. तो अठरा वर्षाचा तरूण नंतर त्या देशाचा सक्षम नागरिक बनतो. आपल्याकडे परिस्थिती उलट आहे. आपण सातत्याने अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने सांगतो आणि नेमके त्याच गोष्टीचे आकर्षण त्या मुलांना होत असते. त्यामुळे मुलं बिघडत असतात मुलांना त्यांचे जग पाहू द्या, जगू द्या आणि मनासारखे निर्णय घेऊ द्या .अंकुश जरूर असावा परंतु, तो अंकुश सुद्धा त्याच्या जीवनाला कलाटणी देणारा असावा असे मत व्यक्त करून डिसले गुरूजींनी विद्यमान परिस्थिती संदर्भातील दाखले दिले. डिसले गुरूजींच्या मनोगतामुळे पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनावर एक समाधानाची लकेर दिसून आली. सन्मान गुनीजणांचा या उपक्रमात शहर व तालुक्यातील यशवंतांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये मुकुंदराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब माने, सी.ए.परीक्षेत उत्तीर्ण ठरलेला निखिल लखेरा, शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम करणारे व्यंकटेश विद्यालयाचे मुख्याध्यापक धनंजय शिंदे, दिव्यांग असतानाही त्याची जाणीव न ठेवता व्यवसायात उत्कृष्टता जपणाऱ्या सुरेखाताई बंग, भारज येथील एस. एन. एस.पुष्पा महिला बचत गट, दत्तपूर येथील गजानन महाराज पुरुष बचत गट,सागर संजय कुलकर्णी, वैद्यकीय सेवेत योगदान देणारे डॉ.शेख जुबेर, अजित सांगळे,उद्योजक सुरज होळंबे, व्यावसायिक सदाशिव सोनवणे यांच्यासह कृतज्ञता सन्मान यामध्ये दत्तात्रय सावरे, दत्तात्रय वालेकर, पंकज भटकर, वैजनाथ शेंगुळे, राजा ठाकूर, संजय गंभीरे यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वार्ता समूहाचे गणेश गव्हाणे, संभाजी मस्के, संतोष वैद्य, संजय मुंडे, श्रीपती मुंडे, राहुल सांगळे, कैलास चोले, नामदेव मुंडे, दत्तात्रय दराडे, श्रेयश गित्ते, श्री.मुंडे यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले तसेच अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ, अ.भा.मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई, तालुका पत्रकार संघ अंबाजोगाई, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा अंबाजोगाई, व्हाईस ऑफ मीडिया अंबाजोगाई, डिजिटल मीडिया संघ अंबाजोगाई आणि गुड मॉर्निंग ग्रुप अंबाजोगाई यांच्या वतीने परिश्रम घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई, केज, बीड, वडवणी, परळी परिसरातील असंख्य हितचिंतक, सहकारी, स्नेहीजन, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी, महिला व पुरूष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===============================
Comments
Post a Comment