महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर मल्लिकार्जुनप्पा बिडवे, सचिव मन्मथप्पा पांडबप्पा लोखंडे यांनी केले अभिनंदन
=======================
संपादक - रणजित डांगे
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निक कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव शनिवार, दिनांक २४ फेब्रुवारी रोजी करण्यात आला.
महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या अंबाजोगाई येथील टी.बी.गिरवलकर पॉलीटेक्निक कॉलेज मध्ये शनिवार,दि.२४ फेब्रुवारी रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे वतीने अध्यक्ष शिवशंकर मल्लिकार्जुनप्पा बिडवे, सचिव मन्मथप्पा पांडबप्पा लोखंडे यांनी अभिनंदन केल्याची माहिती प्राचार्य सुदीप शाहूराव झिरमिरे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी सेमिस्टर परीक्षांमध्ये विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथी यशवंत आरसुडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यात तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग - प्रथम- ओम संजय बुरांडे (94.11 टक्के), द्वितीय - कु.समिक्षा रवींद्र देशपांडे (90 टक्के), तृतीय - कु.अंजली हनुमंत लाड (89.99 टक्के). तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग - प्रथम - विश्वजीत सिंह ठाकुर (89 टक्के), द्वितीय - मनीर जगदीश चौधरी (88.50 टक्के), तृतीय - अभिषेक हरिदास वांद्रे (86.70 टक्के). तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग - प्रथम - योगेश संजय उबाळे (75.05 टक्के). द्वितीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग - प्रथम - अभिषेक सखाराम सुरवसे (88.67 टक्के), द्वितीय- कु.स्नेहल सुधाकर पवार (83.73 टक्के), तृतीय - कु.अंजली सुधीर गवळी (81.33 टक्के). द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग - प्रथम - कु.मुक्ता परमेश्वर बिडकर (83.13 टक्के), द्वितीय- ओम अंकुश भगत (८१.१३ टक्के), तृतीय - साहिल शिराज बागवान (79.63 टक्के). द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग - प्रथम - मेघराज राजकुमार साठे (72.15 टक्के). प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग - प्रथम-कु. ज्ञानेश्वरी धनंजय समसे (86.12 टक्के) आणि शेख मुस्कान फातिमा सुजात (86.12 टक्के), द्वितीय- कु.क्षितिजा आत्माराम आगळे (८५.४१ टक्के), तृतीय - कु.तनुजा बाळासाहेब खरबडे (84.71 टक्के). प्रथम वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग - प्रथम - कु.अर्पिता सतिश हारणावळ (83.65 टक्के), द्वितीय - पांडुरंग प्रेमराज पवार (80.35 टक्के), तृतीय - कु.सृष्टी लक्ष्मण निकम (75.41 टक्के). गणित विषयात 100 गुण घेणार्या कु.क्षितिजा आगळे आणि इतर 7 विद्यार्थ्यांना गणितात विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल प्रा.संजय पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी टी.बी.गिरवलकर पॉलीटेक्निक कॉलेजच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.
=================================
Comments
Post a Comment