डॉ.विश्वनाथ कांबळे यांना कृषि महाविद्यालय तर्फे सेवापूर्ती निमित्त निरोप

अध्यापनात प्रामाणिकपणा व सचोटी महत्वाची - डॉ.बाबासाहेब ठोंबरे डॉ.विश्वनाथ कांबळे यांना कृषि महाविद्यालय तर्फे सेवापूर्ती निमित्त निरोप ================================ लातूर (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) कृषि महाविद्यालय, लातूर येथील कृषि विस्तार विभागाचे प्राध्यापक डॉ.विश्वनाथ कांबळे हे आपल्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ सेवेतून सेवानिवृत्त झाले. कृषि महाविद्यालयाच्या वतीने त्यांना सेवापूर्ती निमित्त निरोप देण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी डॉ.विश्वनाथ कांबळे यांचा अध्यापनात प्रामाणिकपणा व सचोटी महत्वाची या गुणांचा उल्लेख करत यापुढेही त्यांनी आवश्यकतेप्रमाणे कृषि विस्तार कार्यात योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथी डॉ.सोमनाथ रोडे यांनी देशाच्या सकल उत्पादनात कृषिचा वाटा घटत असल्याने निवृत्तीनंतर ही डॉ.कांबळे यांच्यासारख्या अनुभवी तज्ज्ञांनी कृषिच्या विकासात व पर्यायाने देशाच्या विकासात हातभार ला...