ह्रदयस्पर्शी : आमची निष्ठा मुंदडा परिवाराशीच म्हणत अक्षय भुमकर यांनी स्वतःच्या रक्ताने काढले पोर्ट्रेट..!
नेतृत्वावर विश्वास आणि निष्ठेचा आदर्श घालून दिला
==================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
जनसेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच नेतृत्वाची उंची लक्षात येते. बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघात मुंदडा परिवाराने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला विपुल प्रमाणात संधी उपलब्ध करून न्याय दिला आहे. ज्येष्ठांना सन्मान आणि तरूणांना पुढे आणले आहे. अशा मध्यमवर्गीय कुटुंबातील अक्षय भुमकर यांनी स्वतःच्या रक्ताने पोर्ट्रेट काढून आमची निष्ठा मुंदडा परिवाराशीच असल्याचे सांगून नेतृत्वावर विश्वास आणि निष्ठेचा आदर्श घालून दिला आहे.
शहरातील मंगळवार पेठ भागात राहणारे युवक कार्यकर्ते अक्षय भुमकर हे आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सामाजिक बांधिलकी जोपासत ते मोफत शिबीराचे आयोजन करतात. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य निदान, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. आमदार नमिताताई मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वात आणि ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय भुमकर यांच्या सारखे असंख्य तरूण आज भाजपाच्या माध्यमातून लोकांना आवश्यक असलेले समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत. मागील वर्षी भुमकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्याची वर्षपूर्ती म्हणून वेगळी संकल्पना राबवित आपले लाडके नेतृत्व आमदार नमिताताई मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा आणि ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचे फोटो स्वतःच्या रक्ताने पोर्ट्रेट स्वरूपात काढून आपण मुंदडा कुटुंबियांचे कट्टर समर्थक आहोत हे दाखवून दिले आहे. या पोर्ट्रेट वरील आमची निष्ठा मुंदडा परिवाराशीच या नमूद केलेल्या ओळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. सदरील पोर्ट्रेट भुमकर यांनी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांना शुक्रवार, दिनांक २८ जुन रोजी भेट म्हणून दिले आहे. पोर्ट्रेट पाहून ज्येष्ठ नेते मुंदडा यांना गहिवरून आले. कार्यकर्त्याचे आपल्या कुटुंबियांवरील प्रेम पाहून त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. यापुढे असे काही करू नये असे श्री.मुंदडा यांनी उपस्थित सर्वांना सांगितले. तर याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना भुमकर यांनी सांगितले की, हे पोर्ट्रेट आमचे मित्र प्रशांत शिंदे (अंबाजोगाई) यांनी तयार केले आहे. त्यासाठी माझे १० मिली रक्त लागले. व तयार करण्यासाठी अडीच तासांचा कालावधी लागला. यावेळी माजी नगराध्यक्ष महादू मस्के, भाजयुमोचे शहराध्यक्ष संजय गंभीरे, माजी नगरसेवक वाजेद खतीब, प्रदीप चोपने, मंदार काटे, बापू शिंपले, गोविंद उकडे, विष्णू जाधव, विलास काचगुंडे, अक्षय शिंदे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. अक्षय भूमकर यांनी यापूर्वी ही मित्र मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन, ब्लँकेट वाटप, स्वाराती रूग्णालयात रूग्ण व नातेवाईकांना मदत करणे, गोर-गरीब कुटूंबांना स्वस्त धान्य मिळवून देणे, तहसील आणि नगरपरिषद कार्यालय येथे सर्वसामान्य नागरिकांची कामे करून देणे, प्रभागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, रस्ते, नाली, वीज पुरवठा यासाठी पाठपुरावा करणे कोविड काळात रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबांना धान्य व मदत मिळवून देणे, मनोरूग्ण, बेघर लोकांना मदत करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांची सोडवणूक करणे, प्रसंगी आंदोलने करणे, सार्वजनिक प्रश्नांवर निवेदने देणे, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, आरोग्य विषयक बाबींची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करणे, गो-हत्येच्या विरूद्ध सातत्याने आवज उठविणे, नागरिकांसाठीच्या योजना त्यांना मिळवून देणे, नवमतदार नोंदणी उपक्रम राबविणे, शहराच्या सार्वजनिक, पर्यटन व सांस्कृतिक बाबींकरीता पाठपुरावा करणे, अंबाजोगाई शहराचा सांस्कृतिक वारसा, जोपासण्यासाठी हिरीरीने सहभाग घेणे आदी लोकहिताची कामे केलेली आहेत.
कार्यकर्त्यांनी असे काही करू नये :
कार्यकर्ते हे आमचे सहकारी आहेत. ते मुंदडा कुटुंबातील सदस्य आहेत. आमच्या पक्ष नेतृत्वाचा विश्वास, निष्ठावंत कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ व जनतेच्या आशिर्वादावर आम्ही जनसेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत. मागील ३५ ते ४० वर्षांत समाजकारण करताना आम्हाला असंख्य प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्ते हे उत्तम सहकारी व मित्र म्हणून लाभले. त्याबाबत आम्ही नशिबवान आहोत. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याने आमच्यावरील प्रेम, समर्थन व्यक्त करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून, किंवा स्वतःला त्रास होईल असे काही ही करू नये. जसे की, अक्षय भुमकर यांनी जे स्वतःच्या रक्ताने पोर्ट्रेट तयार केले तसे कुणीही काही करू नये. भुमकर यांच्या आपुलकी, प्रेमाचा मनापासून स्वीकार. पण, आदरभाव व्यक्त करण्याचा हा मार्ग नाही. अशा गोष्टींचे समर्थन करता येणार नाही. कारण, कार्यकर्त्याला त्रास होऊ नये अशी आमची कायमच भूमिका राहिलेली आहे.
- नंदकिशोर मुंदडा (ज्येष्ठ समाजसेवक)
काकाजी म्हणजे कार्यकर्ता घडविणारी कार्यशाळा :
बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघात मागील ४० वर्षांपासून राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करीत आहेत. समाजातील सर्वधर्मिय कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित करणे, त्यांना समान संधी उपलब्ध करून देण्याचे काम काकाजी हे सातत्याने करीत आहेत. त्यामुळे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते मुंदडा परिवाराशी जोडले गेले आहेत. मागील एक वर्षापासून मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काकाजींच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. भाजपा प्रवेशाला वर्षपूर्ती झाल्यामुळे आपण स्वतःच्या रक्ताने पोर्ट्रेट तयार केले आहे. काकाजी म्हणजे कार्यकर्ता घडविणारी एक अनुभवी कार्यशाळाच आहेत. आपण यापुढे ही आमदार नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते काकाजी व युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वात कायम समाजसेवा करणार आहोत.
- अक्षय भुमकर (भाजपा कार्यकर्ता)
================================
Comments
Post a Comment