डॉ.विश्वनाथ कांबळे यांना कृषि महाविद्यालय तर्फे सेवापूर्ती निमित्त निरोप

अध्यापनात प्रामाणिकपणा व सचोटी महत्वाची - डॉ.बाबासाहेब ठोंबरे

डॉ.विश्वनाथ कांबळे यांना कृषि महाविद्यालय तर्फे सेवापूर्ती निमित्त निरोप 

================================

लातूर (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) 

कृषि महाविद्यालय, लातूर येथील कृषि विस्तार विभागाचे प्राध्यापक डॉ.विश्वनाथ कांबळे हे आपल्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ सेवेतून सेवानिवृत्त झाले. कृषि महाविद्यालयाच्या वतीने त्यांना सेवापूर्ती निमित्त निरोप देण्यात आला.

या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी डॉ.विश्वनाथ कांबळे यांचा अध्यापनात प्रामाणिकपणा व सचोटी महत्वाची या गुणांचा उल्लेख करत यापुढेही त्यांनी आवश्यकतेप्रमाणे कृषि विस्तार कार्यात योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथी डॉ.सोमनाथ रोडे यांनी देशाच्या सकल उत्पादनात कृषिचा वाटा घटत असल्याने निवृत्तीनंतर ही डॉ.कांबळे यांच्यासारख्या अनुभवी तज्ज्ञांनी कृषिच्या विकासात व पर्यायाने देशाच्या विकासात हातभार लावावा असे नमूद केले. यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी शिवाजी गिरी तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.दिनेशसिंह चौहान, डॉ.प्रशांत करंजीकर, डॉ.अनंत शिंदे, डॉ.ज्ञानेश्वर सुरडकर, श्री.सुधाकर स्वामी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना डॉ.विश्वनाथ कांबळे यांनी त्यांना शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी मदत केलेल्या गुरूजनांचा आवर्जून उल्लेख करत त्यांचे ऋण व्यक्त केले. सोबतच सहकारी व कुटुंबियांचे सेवेच्या प्रदीर्घ कालावधीत वेळोवेळी सहकार्य मिळाल्याचे सांगितले. या कार्यक्रमास गळीत धान्य विशेषज्ज्ञ डॉ.मोहन धुपे, कृषितंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक गोटमुकले तसेच कृषि महाविद्यालयाचे डॉ.संतोष कांबळे, डॉ.पद्माकर वाडीकर, डॉ.राजेश शेळके, डॉ.अनिलकुमार कांबळे, डॉ.नितीन तांबोळी, डॉ.विनोद शिंदे, डॉ.अजित पुरी, राहुलदेव भवाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दयानंद मोरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ.संघर्ष शृंगारे यांनी मानले.

=================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)