राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार पृथ्विराज साठे व तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार पृथ्विराज साठे व तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

स्वाराती रूग्णालयातील सिटीस्कॅन मशिन सुरू झाल्यामुळे रूग्णांना दिलासा

==================================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) 

येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात मागील अनेक दिवसांपासुन आरोग्य सेवेसाठी आवश्यक असलेल्या विविध मशिन व यंत्रसामुग्री बंद आहेत. त्यामुळे रूग्णांचे मोठे हाल होत आहेत. तरी शासन व प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलावीत आणि सदरील प्रश्नांची सोडवणूक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार पृथ्विराज साठे व तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी दिनांक २० मे रोजी दिलेल्या निवेदनातून केली होती. याप्रश्नी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून अखेर स्वाराती शासकीय ग्रामीण वैद्यकीय रूग्णालयातील सिटीस्कॅन मशिन पुर्ववत सुरू झाली आहे. यामुळे रूग्णांना दिलासा मिळणार आहे.

रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता यांना यापूर्वी दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार पृथ्विराज साठे व तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी नमूद केले होते की, स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, अंबाजोगाई मध्ये गेल्या अनेक दिवसांपासुन अनेक मशिन व यंत्रसामुग्री बंद आहेत. त्यामुळे रूग्णांचे बरेच हाल होत आहेत. त्यामुळे एकूण ८ मागण्यांची पूर्तता व सोडवणूक करण्यात यावी. असे नमूद करण्यात आले होते. याबाबत सर्व मागण्यांचा विचार करून तात्काळ सर्व यंत्र सामुग्री सुरू करण्यात यावी. अन्यथा आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ही सदरील निवेदनातून देण्यात आला होता. सदरील निवेदनाच्या प्रती १) मा.एकनाथराव शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई., २) मा.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई., ३) मा.हसन मुश्रीफ, मंत्री वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई. आणि ४) मा.धनंजय मुंडे, पालकमंत्री बीड जिल्हा यांना पाठवण्यात आल्या होत्या. त्यानंतर एकूण ८ मागण्यांपैकी महत्त्वाची असलेली सी.टी.स्कॅन मशीन ही जवळपास गेल्या सहा महिन्यांपासुन बंद होती. ही मशीन सुरू झाल्यामुळे याचा फायदा आता रूग्णसेवेला होणार आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माजी आमदार साठे व तालुकाध्यक्ष देशमुख यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलेल्या इतर ही मागण्यांबाबत स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय प्रशासन हे अनुकूल असून लवकरच सर्व मागण्या मान्य होवून स्वारातीची रूग्णसेवा पुर्ववत होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार पृथ्विराज साठे व तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी व्यक्त केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने सातत्यपूर्ण पाठपुरावा करून सिटीस्कॅन मशिन सुरू झाल्यामुळे रूग्ण व‌ त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.

▪️▪️▪️

=============================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)