नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व जिल्हा मेळाव्याचे माजलगांव येथे आयोजन - मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - तालुकाध्यक्ष मधुकर सुरवसे यांचे आवाहन

नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व जिल्हा मेळाव्याचे माजलगांव येथे आयोजन - मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - तालुकाध्यक्ष मधुकरराव सुरवसे यांचे आवाहन

=======================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) 

महाराष्ट्र नाभिक महामंडळ, बीड जिल्हा आयोजित नाभिक समाजातील इयत्ता १० वी, १२ वी आणि नीट परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये जसे डॉक्टर, इंजिनिअर, वकील, नागरी सेवा, शासकीय निमशासकीय नौकरी मिळवलेल्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा तसेच जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात येते. तसेच यावर्षीही गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन सोमवार, दिनांक १० जून २०२४ रोजी सकाळी ११ वाजता वैष्णवी मंगल कार्यालय, गजानन मंदिर रोड, माजलगाव (जि.बीड) येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या शुभहस्ते स्वागत करण्यात येणार आहे. तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष भगवानराव वाघमारे हे राहणार आहेत. तर यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष दामोदर काका बिडवे, प्रदेश सरचिटणीस पांडुरंग भवर, कर्मचारी महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष उत्तमराव सोलाणे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र भैय्या कावरे, बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाशराव कानगावकर, मराठवाडा अध्यक्ष युवराज शिंदे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास नाभिक समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक व नागरीकांनी या मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अनंत राऊत (केज), बीडचे जिल्हाध्यक्ष दिलीप झगडे व महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डी.डी.राऊत व महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष मधुकरराव सुरवसे (अंबाजोगाई) यांनी केले आहे.

================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)