रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या युवक जिल्हाध्यक्षपदी ऋषिकेश शिंदे, युवक तालुकाध्यक्षपदी अजय आगळे तर अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी नासेर कलीम शेख

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी

युवक जिल्हाध्यक्षपदी ऋषिकेश शिंदे, युवक तालुकाध्यक्षपदी अजय आगळे तर अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी नासेर कलीम शेख

===================================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाची बीड जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या निवडी शुक्रवार, दिनांक ३१ मे रोजी करण्यात आल्या यात युवक बीड जिल्हाध्यक्षपदी ऋषिकेश शिंदे, युवक अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी अजय आगळे तर अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी नासेर कलीम शेख यांचा समावेश आहे. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे, राष्ट्रीय महासचिव डॉ.मोहनलाल पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या आदेशानुसार शुक्रवार, दि.३१ मे २०२४ रोजी अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचे मराठवाडा संपर्कप्रमुख प्रकाश वेदपाठक, मराठवाडा संघटक संजय तेलंग, बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली युवक बीड जिल्हाध्यक्षपदी ऋषिकेश शिंदे, युवक अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी अजय आगळे तर अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी नासेर कलीम शेख यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत करून व त्यांना नियुक्तीपत्र देवून त्यांच्यावर पक्षाच्या महत्त्वपूर्ण पदांच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. यावेळी निलेश जाधव यांच्यासह इतर मान्यवरा,कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत सर्वानुमते अनुक्रमे ऋषिकेश शिंदे, अजय आगळे व नासेर कलीम शेख यांची निवड करण्यात आली. यावेळी मार्गदर्शक म्हणून बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे मराठवाडा संपर्कप्रमुख प्रकाश वेदपाठक म्हणाले की, भविष्यात होवू घातलेल्या महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्धार केला आहे. या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे मराठवाडा विभाग आणि बीड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी युवक बीड जिल्हाध्यक्षपदी ऋषिकेश शिंदे, युवक अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी अजय आगळे तर अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी नासेर कलीम शेख यांच्या निवडीबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी स्वागत व अभिनंदन केले. आपल्या निवडीबद्दल आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नवनिर्वाचित युवक बीड जिल्हाध्यक्ष ऋषिकेश शिंदे यांनी पक्षाचे राष्ट्रीय नेते दिपक भाऊ निकाळजे, राष्ट्रीय महासचिव डॉ.मोहनलाल पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार तसेच मराठवाडा संपर्कप्रमुख प्रकाश वेदपाठक, मराठवाडा संघटक संजय तेलंग, बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांचे आभार मानले. या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना सोबत घेऊन आपण बीड जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत व बळकट करू, पक्षाची भूमिका समाजात सर्वदूर पोहोचवू असे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) बीडचे नवनिर्वाचित युवक जिल्हाध्यक्ष ऋषिकेश शिंदे यांनी स्पष्ट केले.

===============================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)