पतंजलि योग समितीच्या शिबिरांचे शतक ; माजी सैनिक दत्ता लांब यांनी ५५ हजार विद्यार्थ्यांना दिले योगाचे मोफत धडे

पतंजलि योग समितीच्या शिबिरांचे शतक ; माजी सैनिक दत्ता लांब यांनी ५५ हजार विद्यार्थ्यांना दिले योगाचे मोफत धडे

एमआयटी शालेय विभाग येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

===================================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

एमआयटी शालेय विभाग आणि पतंजली योग समिती अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवार, दिनांक २१ जुन रोजी एमआयटी शालेय परिसर, नागझरी, शेपवाडी, अंबाजोगाई येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

शहर व तालुक्यातील विविध शाळा तसेच महाविद्यालयातून आयोजित करण्यात आलेल्या १०० शिबिरांतून तब्बल ५५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मागील ११ महिन्यांपासून योगाचे मोफत धडे देण्याचे काम माजी सैनिक योग प्रशिक्षक दत्ता सदाशिव लांब यांनी केले आहे. त्यांच्या १०० व्या योग विज्ञान शिबिराच्या सांगता समारोहाचे आयोजन एमआयटी शालेय विभाग येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त करण्यात आले होते. पतंजलि योग समितीचे मुख्य योग प्रशिक्षक माजी सैनिक आयुर्वेदिक चिकित्सक दत्ता लांब यांनी मागील ११ महिन्यांपासून सुरू केलेल्या योग दिंडी आपल्या दारी या अभियानांतर्गत १०० व्या योग विज्ञान शिबिराचा सांगता समारोह शुक्रवार, दिनांक २१ जून रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय ग्रामीण रूग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक तिडके मॅडम, पोलीस उपअधिक्षक चोरमुले, गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे, नितेश शिराळे (मुख्याध्यापक, जि.प.प्रा.शा,सोनपेठ), दत्तात्रय दराडे (संचालक, ज्ञानदीप अकॅडमी), धनंजय इंगळे (प्रभारी, पतंजलि योग समिती, अंबाजोगाई), ब्रह्मकुमारी मंजुषा दीदी, योग प्रशिक्षक दत्ता लांब, एमआयटी शालेय विभाग कार्यकारी संचालक राजेश कराड, सौ.शुभांगीताई कराड, संचालक संगप्पा तलेवाड, प्राचार्य सागर राऊत, प्राचार्य रामराजे कराड, उपप्राचार्य शरद बोंदर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्ज्वलन, सरस्वती पूजन आणि विश्वशांती प्रार्थनेने झाली. यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा व शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पंचायत समिती, तहसील कार्यालय कर्मचारी, पत्रकार बांधव तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या योग दिनाच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. ब्रह्मकुमारी मंजुषा दीदी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी माजी सैनिक दत्ता लांब (योग शिक्षक व प्राकृतिक चिकित्सक) यांचा यथोचित सन्मान केला. तर यावेळी जागतिक योग दिनानिमित्त शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल पतंजलिकडून मान्यवरांच्या हस्ते एमआयटी शालेय विभाग यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. या प्रसंगी ब्रह्मकुमारी मंजुषा दीदी यांनी ध्यान या विषयावर माहिती दिली, तर धनंजय इंगळे (प्रभारी, पतंजलि योग समिती, अंबाजोगाई) यांनी योग प्रोटोकॉल शिकवला आणि लांब यांनी अवघ्या सात मिनिटांत फिटनेससाठी उपयुक्त ठरतील अशी योगातील विविध ८४ आसने करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच शिवतांडव द्वारे मान्यवरांचे स्वागत ही केले. या शिबीरात सहभागी सर्वांना मोफत योग शिक्षण देण्यात आले. यावेळी सुत्रसंचालकांनी लांब यांच्या निःशुल्क, निस्वार्थ योगसेवेचे स्वागत केले. लांब हे भारतीय सैन्यात फिजीकल शिक्षक म्हणून कार्यरत होते. म्हणून त्यांच्या अनुभवाचा आणि मौलिक मार्गदर्शनाचा फायदा सैन्य, पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरत आहे असे सांगून त्यांनी पतंजलि योग समितीच्या योग दिंडी आपल्या दारी या समाजोपयोगी अभियानाचे ही विशेष कौतुक केले. दैनंदिन जीवनात योगाचे काय महत्त्व आहे. ते नि:शुल्क शिकविण्याचे काम लांब हे करीत आहेत. अंबाजोगाई शहर व तालुक्यातील अनेक शाळा व महाविद्यालयातून विद्यार्थ्यांसाठी १५,९,६,३,२ व १ दिवसीय अशा एकूण १०० योग प्रशिक्षण शिबीरे घेवून यात तब्बल ५५ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना दिनचर्या, आहार, योगिक डि.बिन्द्रिक, प्राणायाम, सर्व प्रकारचे आसन, योगनिद्रा, ध्यान यांचा अभ्यास व योगाचे धडे देण्याचे मौलिक काम माजी सैनिक लांब हे करीत आहेत. २१ वर्षे भारतीय सैन्य दलात असताना देखील लांब यांनी दरमहा आपली आर्धी पगार गोर-गरीबांसाठी खर्च केली आहे. सैन्यात देशसेवा करून निवृत्ती नंतर मागील ११ महिन्यांहून अधिक काळ ते आपली आर्धी पेंन्शन सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करीत आहेत. ही खरच प्रेरणादायी व कौतुकास्पद बाब आहे. माजी सैनिक दत्ता लांब हे योगाच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. अंबाजोगाई शहर व परिसरातील युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक यांना निःशुल्क, मोफत योग सेवा देवून त्यांचे स्वास्थ निरोगी राहण्यासाठी ते आहोरात्र प्रयत्नशील आहेत असे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक चि.सागर घुमरे याने सांगितले. तर उपस्थितांचे आभार चि.ओमकार दहिवाळ याने मानले. या बाबत संवाद साधला असता योग प्रशिक्षक लांब यांनी सांगितले की, जागतिक योग दिनानिमित्त पतंजलि योग समितीच्या माध्यमातून व एमआयटी शालेय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवा पिढीसाठी आम्ही योग शिबीर आयोजित केले होते. आजसह मिळून आयोजित एकूण सर्व १०० शिबिरांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही सर्व शिबीरे विद्यार्थ्यांसाठी मोफत आयोजित करण्यात आलेली होती. या पुढेही निःशुल्क आणि मोफत योग प्रशिक्षण देण्याचे काम आम्ही करणार आहोत. त्याचा लाभ अंबाजोगाईतील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन माजी सैनिक योग प्रशिक्षक लांब यांनी केले आहे.

==============================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)