पंकजाताईंसाठी मुंदडा कुटुंबियांनी इमानेइतबारे काम केले - संजय गंभीरे

पंकजाताईंसाठी मुंदडा कुटुंबियांनी इमानेइतबारे काम केले - संजय गंभीरे

बिनबुडाचे आरोप व अपप्रचार करू नये ; सामाजिक सलोखा बिघडवू नये केले आवाहन

===============================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्यासाठी केज विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार नमिताताई मुंदडा व कुटुंबियांनी इमानेइतबारे काम केले आहे. याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. कारण, मी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभागी होतो. केजमध्ये आ.मुंदडांसह ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व युवा नेते अक्षय मुंदडा यांच्यासह त्यांना मानणारे भाजप नेते व आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी ही आपली सगळी ताकद पंकजाताई यांच्या पाठीशी उभी केली होती. तरी पण, केज विधानसभा मतदारसंघात प्रचार काळात सर्वांच्या केंद्रस्थानी आ.मुंदडा याच होत्या. दरम्यान, निवडणुकीत शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी आपली संपूर्ण यंत्रणा ही भाजपाच्या मागे उभी केली. त्याचा फायदा अंबाजोगाई शहरासह केज, नेकनूर व बीड तालुक्यासह इतर भागांतही झाला. केवळ मुंदडा कुटुंबियांच्या सुनियोजित पद्धतीने राबविण्यात आलेल्या प्रचार यंत्रणेमुळे भाजपाला लक्षनिय मते मिळाली. पण, ही निवडणूक काहीशी वेगळी होती. यावेळेस बीड जिल्ह्यातील सामाजिक परिस्थिती पुर्णतः निराळी होती. त्यामुळेच की, काय मुंदडा कुटुंबियांनी कार्यकर्त्यांसह अहोरात्र मेहनत घेवून ही भाजपाला या निवडणूकीत निसटता पराभव स्वीकारावा लागला. त्याला कारणं खूप वेगळी आहेत. त्यामुळे, पंकजाताई मुंडे यांच्यासाठी या निवडणुकीत मुंदडा कुटुंबियांनी संपूर्ण ताकद लावली, प्रभावी यंत्रणा उभी केली हे कुणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळे काही ही माहिती नसताना केवळ हेव्यादाव्यापोटी व गैरसमजातून सोशल मीडियावरून बिनबुडाचे आरोप व अपप्रचार करू नये ; तसेच बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडवू नका असे आवाहन भाजयुमोचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी केले आहे.


याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अंबाजोगाई भाजयुमोचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी सांगितले की, मागील ३५ वर्षांपासून अधिक काळ मुंदडा कुटुंब हे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन व आपल्या परिवारातील एक भाग, घटक समजून यशस्वी वाटचाल करीत आहे. प्रत्येकाच्या सुख-दुःखात ते सहभागी होतात. प्रत्येकाच्या मदतीला धावून येतात. मागील काही महिन्यांपासून केज विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आ.नमिताताई यांनी भाजप नेतृत्वाच्या माध्यमातून करोडो रूपयांचा निधी मंजूर करून आणला. यातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे पूर्ण झाली. काही पुर्ण होत आहेत. दिवसेंदिवस भाजपा व आ.नमिताताई यांची केज विधानसभा मतदारसंघात वाढत असलेली लोकप्रियता पाहून काही जणांना पोटशूळ उठले आहे. तेच लोक सोशल मीडियावरून चुकीच्या पोस्ट टाकून अपप्रचार व खोट्या अफवा पसरवित आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. खरी परिस्थिती व सत्य हे आहे की, आपण लोकसभा निवडणूक आमच्या नेत्या केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबविली. सुरूवातीच्या बैठकीपासून मुंदडा कुटुंबियांनी ही निवडणुक स्वतःची निवडणूक समजून जनता, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी कायम संपर्क व सुसंवाद ठेवला. पक्षाच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवरून आलेल्या सर्व सुचनांचे योग्य रीतीने पालन केले. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठका घेतल्या. जबाबदाऱ्यांचे वाटप केले. आपल्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. तगडी यंत्रणा राबविली. मुंदडा कुटुंबियांनी लोकसभेला अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. एकाही कार्यकर्त्यांने या संदर्भात साधी वैयक्तिक तक्रार ही केली नाही. शंका ही उपस्थित केली नाही. आपल्या नेत्या पंकजाताई यांच्यासह पक्षाच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांना ही हे माहित आहे की, मुंदडा कुटुंबियांनी लोकसभेला अतिशय प्रामाणिकपणे व इमानेइतबारे काम केलं. मात्र, असे असले तरीही काही ही माहिती नसलेले, निवडणूक प्रक्रियेत ज्यांनी कधी सक्रिय सहभाग घेतला नाही. असे काही लोक केवळ राजकीय हेव्यादाव्यापोटी व गैरसमजातून सोशल मीडियावरून बिनबुडाचे आरोप व अपप्रचार करीत आहेत. आमच्या नेत्यांविषयी जाणीवपूर्वक खोट्या पोस्ट पेरल्या जात आहेत. या गोष्टीत अजिबात तथ्य नसून या गोष्टी पूर्णपणे खोटारड्या व जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या आहेत. अशा गोष्टी पेरल्याने काय साध्य होणार आहे, असा प्रश्नही गंभीरे यांनी उपस्थित केला आहे. यामुळे बीड जिल्ह्यासह केज विधानसभा मतदारसंघातील सामाजिक सलोखा बिघडत चालला आहे. त्यामुळे फेसबुक, व्हाॅट्सॲप सह विविध सोशल मीडिया माध्यमातून मुंदडा कुटुंबियांविषयी खोटी माहिती प्रसारित करणाऱ्या तसेच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकू नयेत. सामाजिक बांधिलकी जोपासा आपल्यातील सलोखा कायम ठेवा अशी विनंती व आवाहन भाजयुमोचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी केले आहे.


बिनबुडाचे आरोप व अपप्रचार करू नये ; सामाजिक सलोखा बिघडवू नये केले आवाहन :

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून बीड जिल्ह्यातील सर्व समाज जगत आहे. काही समाजकंटक आक्षेपार्ह पोस्ट टाकून जिल्ह्याचे सामाजिक सौहार्द आणि शांतता बिघडण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजकंटांच्या प्रयत्नांमुळे बीडची शांतता, एकोपा आणि बंधुभाव बिघडू नये, यासाठी बीड पोलीस ही नागरिकांना आवाहन करीत आहे की, सोशल मिडीयावर सामाजिक शांतता बिघडविणाऱ्या, दोन समाज व दोन जातीमध्ये तेढ निर्माण होईल अश्या पोस्ट करणे, अफवा पसरवणे, कमेंट करणे, शेअर करणे या गोष्टी कटाक्षाने टाळा व स्वत:ला कठोर कायदेशीर कारवाई पासून दूर ठेवा. आपल्या प्रत्येक सोशल कृतीवर बीड जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस सोशल मिडीयावर २४ तास लक्ष ठेऊन आहेत. आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणे सुरू आहे, म्हणून आपला सामाजिक सलोखा आणि सौहार्द जपायची जबाबदारी प्रत्येक जिल्हावासीयांची आहे. निवडणुकीत जय-पराजय होत असतात. सोशल मीडियावर वातावरण दूषित करू नये. मात्र अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक व विविध नेत्यांची वैयक्तिक अवहेलना करणाऱ्या पोस्ट केल्या जात असून याद्वारे सामाजिक सलोखा बिघडून आपसातील द्वेष व तणाव वाढत आहे. नेत्यांविषयी खोट्या पोस्ट करून वातावरण दूषित केले जात आहे. अत्यंत खालच्या भाषेत राजकीय नेत्यांवर टीका करणाऱ्या पोस्टमुळे कटुता वाढत आहे. त्यामुळे आपला सामाजिक सलोखा व सौहार्द जपण्याची जबाबदारी आता प्रत्येकाची आहे, असे आवाहन संजय गंभीरे यांनी केले आहे.

===============================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)