लोक जनशक्ती पार्टीच्या मराठवाडा प्रदेशाध्यक्षपदी राजेश वाहुळे यांची फेरनिवड

लोक जनशक्ती पार्टीच्या मराठवाडा प्रदेशाध्यक्षपदी राजेश वाहुळे यांची फेरनिवड

निष्ठावंत राजेश वाहुळे यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत

===================================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

दलित, बहुजन व अल्पसंख्याकांच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा पक्ष म्हणून लोक जनशक्ती पार्टीची संपूर्ण देशात सर्वदूर ओळख आहे. लोक जनशक्ती पार्टी व दलित सेनाचे संस्थापक नेते दिवंगत माजी केंद्रीय मंत्री रामविलासजी पासवान यांच्या प्रेरणेने सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करीत असलेल्या लोक जनशक्ती पार्टीच्या मराठवाडा प्रदेशाध्यक्षपदी राजेश बालाजी वाहुळे यांची फेरनिवड नुकतीच करण्यात आली आहे. निष्ठावंत कार्यकर्ते वाहुळे यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.

लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे अन्न, प्रक्रिया खात्याचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री चिरागजी पासवान, युवा राष्ट्रीय अध्यक्ष प्रणव कुमार यांच्या आदेशावरून युवा प्रदेशाध्यक्ष मोहन अनमोलु यांनी शिर्डी येथे स्वतःचे हस्ते नियुक्तीपत्र देवून लोक जनशक्ती पार्टीच्या मराठवाडा प्रदेशाध्यक्षपदी राजेश बालाजी वाहुळे यांची फेरनिवड केली आहे. नियुक्तीपत्रात मराठवाडा प्रदेशात पक्ष बळकटीसाठी संघटन मजबूत व व्यापक करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करून दलित, बहुजन व अल्पसंख्याकांच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांसाठी न्याय मिळवून देण्याकरिता सदैव प्रयत्नशील रहावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. राजेश वाहुळे हे येथील आंबेडकरी चळवळीतील एक अभ्यासू युवा कार्यकर्ते आहेत. ते मागील एकोणवीस वर्षांपासून सामाजिक व दलित चळवळी मध्ये कार्यरत आहेत. चळवळी मध्ये त्यांचे सातत्यपूर्ण योगदान आहे. युवा कृती समितीचे अंबाजोगाई जिल्हा निर्मिती आंदोलनात सहभाग, जयवंती नदी वाचवा जनआंदोलन, नगरपालिकेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने जनहिताचे कार्य करावे, स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करा, नळपट्टी माफ करा, नियमित स्वच्छता करून साथरोगांचा फैलाव थांबवा, दलित वस्ती सुधार योजना राबवा अशा मागण्या केल्या तसेच नगरपरिषद टेंडर घोटाळा उघडकीस आणला, तहसीलच्या अन्न व पुरवठा विभागाकडून गरजूंना स्वस्त धान्य वाटप करायला लावले, रेशनचा काळाबाजार थांबवला, विविध शासकीय कार्यालयातील सतत अनुपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांची पोलखोल केली. शासकीय भूखंड विक्री उजेडात आणली. राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरण, डिव्हायडर बसविण्यासाठी तसेच स्वाराती शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधांसाठी पाठपुरावा केला. आरटीओ कार्यालय, शिक्षण विभाग येथील अनागोंदी कारभार उघडकीस आणला. खोटी ऍट्रोसिटी मागे घ्यावी यासाठी, तसेच दप्तर दिरंगाई, गैरव्यवहार यावर वेळोवेळी प्रहार ही केला. शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, कामगार, विद्यार्थी यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. प्रसंगी बेमुदत आमरण उपोषण, निवेदन, आंदोलन केले. मोर्चे ही काढले. २०० हून अधिक विविध लक्षवेधी निवेदन देवून प्रसंगी आंदोलने ही केली. जनहितासाठी अनेकदा त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. अशा राजेश वाहुळे यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून विविध आंदोलनांच्या माध्यमातून प्रसंगी राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी विधायक संघर्ष ही केला आहे. बांधिलकी जोपासत गोरगरीब, गरजू लोकांना दवाखाना असो, तहसील असो किंवा पोलिस स्टेशन येथे त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वाहुळे हे सदैव प्रयत्नशील असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन निष्ठावंत कार्यकर्ते राजेश वाहुळे यांची शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत फेरनिवड करण्यात आली आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकारी ज्ञानेश्वर खरात, जिल्हाध्यक्ष साहेबराव नवतुरे, अण्णा नरवडे (शहर कार्याध्यक्ष), प्रवीण मोरे शहराध्यक्ष (पश्चिम), अश्विनी गुंडे (जिल्हा सचिव), राजेश घुसर शहराध्यक्ष (मध्य), डॉ.सुनील महाकाळे, राहुल गंगावणे (शहराध्यक्ष पूर्व), ज्ञानेश्वर गोरे (बीड जिल्हाध्यक्ष, लोक जनशक्ती पार्टी युवा.), अशोक काळे (लोक जनशक्ती पार्टी अंबाजोगाई तालुकाध्यक्ष युवा, आदित्य चौरे (अंबाजोगाई तालुका कार्याध्यक्ष लोकजनशक्ती पार्टी युवा.), प्रदीप गुंडरे (अंबाजोगाई शहराध्यक्ष लोक जनशक्ती पार्टी युवा.) यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. राजेश वाहुळे यांच्या फेरनिवडीचे मराठवाड्यातून स्वागत होत आहे.

लोक जनशक्ती पार्टीचा विचार मराठवाड्यात सर्वदूर पोहोंचवणार :

राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे अन्न, प्रक्रिया खात्याचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री चिरागजी पासवान, युवा राष्ट्रीय अध्यक्ष प्रणव कुमार, युवा प्रदेशाध्यक्ष मोहन अनमोलु यांनी मराठवाडा प्रदेशाध्यक्षपदी माझी फेरनियुक्ती करून पुन्हा जबाबदारी सोपविली आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. नेत्यांचा विश्वास आपण सार्थ ठरवू, पुढील काळात लोक जनशक्ती पार्टीची संघटनात्मक बांधणी केली जाईल, संघटनेच्या सर्व आजी - माजी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन लोक जनशक्ती पार्टी हा पक्ष मराठवाड्यात अधिक बळकट करणार आहोत.

- राजेश वाहुळे

(मराठवाडा प्रदेशाध्यक्ष, लोक जनशक्ती पार्टी.)

================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)