भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, एसआरपी व इतर मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केला अर्ज दाखल

मागील पाच वर्षांत सातत्यपूर्ण जनसंपर्क ठेवून प्रामाणिकपणे विकासकामे केली - आ. नमिता अक्षय मुंदडा भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, एसआरपी व इतर मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केला अर्ज दाखल =================================== अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, एसआरपी व इतर मित्र पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी सोमवार, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी केज तहसील कार्यालयात सहकाऱ्यांसह जाऊन अत्यंत साध्या पद्धतीने आपला २३२ केज विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रारंभी केज विधानसभा मतदारसंघासाठी भाजप - महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सोमवारी सकाळी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या गोपीनाथ गड (परळी वैजनाथ) या स्मृतीस्थळी नतमस्तक होत अभिवादन केले. तसेच उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी केज विधानसभा मतदारसंघाच्या भाग्यविधात्या स्वर्गीय डॉ.विमलताई मुंदडा यांच्या चनई (अंबाजोगाई) येथील स्मृतिस्थळी नतमस्तक होत अभिवादन केले. केज तहसील कार्यालयात सहकाऱ्...