खासदार बजरंगबप्पा सोनवणे, आ.नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते होणार तात्या-आभई प्रतिष्ठानच्या सेवागौरव पुरस्कारांचे वितरण
==================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
अंबाजोगाई येथील तात्या-आभई प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात येणारे सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून येत्या १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे सचिव ऍड.राजेंद्रप्रसाद धायगुडे यांनी दिली आहे.
या संदर्भात प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात पुढे असे म्हटले आहे की सदरील पुरस्कार हे १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात खासदार बजरंग बप्पा सोनवणे, आ.सौ.नमिताताई अक्षय मुंदडा, स्थानिक स्वराज्य संस्थेचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, जिल्हा पोलीस प्रमुख अविनाश बारगळ, तहसिलदार विलास तरंगे, माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहेत. तात्या - आभई प्रतिष्ठानच्या वतीने मागील तीन वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सेवा गौरव पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. यावर्षीही विधी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ ऍड.विठ्ठल कृष्णाजी चौसाळकर यांना विधी सेवा गौरव पुरस्कार, आरोग्य सेवेतील विशेष कार्याबद्दल डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांना आरोग्य सेवा गौरव पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा.संजय प्रभाकर कुलकर्णी यांना शिक्षण सेवा गौरव पुरस्कार, पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांना पत्रकारिता गौरव पुरस्कार तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ऍड.संतोष पवार यांना समाजसेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदरील पुरस्कार हे ज्येष्ठ विधिज्ञ कै.ऍड.आण्णासाहेब लोमटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मागील तीन वर्षांपासून देण्यात येत असून सदरील पुरस्कार वितरण सोहळ्यास आपण उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे सचीव ऍड.राजेंद्रप्रसाद धायगुडे व इतर संचालकांनी केले आहे.
=====================================
Comments
Post a Comment