भावी अनेक, प्रभावी मात्र एक आमदार नमिताताई मुंदडा
केज मतदारसंघातील जनतेचा आशिर्वाद आमदार सौ.नमिताताई यांच्या पाठीशी - अक्षय भुमकर
===================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
केज विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या विद्यमान आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या पाठीशी केज मतदारसंघातील जनतेचा आशिर्वाद कायम आहे. त्यामुळे भावी अनेक, प्रभावी मात्र एकच त्या म्हणजे आमदार सौ.नमिताताई मुंदडा या होय असे प्रतिपादन भाजपाचे कार्यकर्ते व अक्षय भैय्या मुंदडा यांचे कट्टर समर्थक अक्षय भुमकर यांनी केले आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अक्षय भुमकर यांनी सांगितले आहे की, केज विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार सौ.नमिताताई व मुंदडा कुटुंबिय हे अहोरात्र जनसेवेचे काम करीत आहेत. याचा मी स्वतः साक्षीदार आहे. कारण, मी अक्षय भैय्या मुंदडा यांचा समर्थक व भाजपाचा कार्यकर्ता आहे. केज मतदारसंघामध्ये आ.सौ.नमिताताई मुंदडांसह ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा (काकाजी) व युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांच्यासह त्यांना मानणारे भाजप नेते व आमच्या सारख्या छोट्या समाजातील कार्यकर्ते हे पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपली सगळी ताकद, यंत्रणा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभी करीत आहोत. आज केज विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील सर्वांगीण विकासाचे श्रेय हे आ.सौ.नमिताताई मुंदडा यांनाच जाते. कारण, विविध योजनांच्या माध्यमातून करोडो रूपयांचा निधी केवळ मागील दोन वर्षात आमदार मुंदडा यांनी मंजूर करून आणला आहे. या मोठ्या प्रमाणावरील निधीतून आज मतदारसंघातील वाडी, वस्ती, तांडा, गल्ली, कॉलनीत प्रशस्त व मजबूत रस्ते, दुतर्फा रूंद नाल्या, पुल, सामाजिक सभागृह, सर्वधर्मिय सर्वजातीय समाजासाठी व त्यांच्या धार्मिक स्थळांसाठी, शाळेसाठी, स्मशानभूमीसाठी तसेच शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, श्रमजीवी, कामगार, विद्यार्थी, आदिवासी, महिला आणि अल्पसंख्यांक समाजासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येकाच्या सुख-दुःखात मुंदडा कुटुंब नेहमीच सहभागी असते. दरम्यान, निवडणुक असो किंवा नसो मुंदडा कुटुंब सदैव जनसेवा करण्यात व्यस्त आहे. एकिकडे शासनाच्या विविध शासकीय कार्यालयात ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी पाठपुरावा करून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य लोकांना मिळवून दिल्या आहेत. तर दुसरीकडे मात्र समाजातील शेवटच्या माणसापर्यंत मुंदडा हे आपली संपूर्ण यंत्रणा व ताकद भाजपाच्या मागे उभी करून पक्ष संघटना बळकट करीत आहेत. त्याचा फायदा अंबाजोगाई शहरासह केज, नेकनूर व बीड तालुक्यासह इतर भागांतही भाजपाला होत आहे. केवळ मुंदडा कुटुंबियांच्या सुनियोजित पद्धतीने करण्यात येणाऱ्या जनसेवेच्या कार्यामुळे भाजपा हा केज मतदारसंघात संघटनात्मक दृष्टीने प्रभावी पक्ष बनला आहे. यावेळेस बीड जिल्ह्यातील सामाजिक परिस्थिती पुर्णतः निराळी आहे असे जरी वरकरणी दिसत असले तरी जनतेला नमिताताई मुंदडा याच पुन्हा आपल्या हक्काच्या आमदार म्हणून हव्या आहेत. त्याचे कारण म्हणजे त्या २४ तास जनतेसाठी उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर मतदारसंघातील एकमेव राजकीय नेतृत्व म्हणून मुंदडा कुटुंबाकडे पहाता येईल. जे प्रत्येकाच्या सुख-दुःखात, कार्यक्रमात, उपक्रमात मुंदडा कुटुंब हे सक्रिय सहभागी होते. त्यामुळेच की, काय मुंदडा कुटुंबियांना अहोरात्र मेहनत घेणारे कार्यकर्ते हे उत्तम सहकारी म्हणून लाभले आहेत. काही ही माहिती नसताना केवळ हेव्यादाव्यापोटी व गैरसमजातून सोशल मीडियावरून बिनबुडाचे आरोप व अपप्रचार करून विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत. काही भावींना आमदार होण्याची तीव्र इच्छा आहे. मागील अनेक वर्षांपासून जी माणसं कुठेच दिसून आली नाहीत. कुणाच्या सुखदुःखात सहभागी झाली नाहीत, कुणाला सढळ हस्ते मदत केली नाही, लोकांचे प्रश्न, समस्या सोडविण्याचा कधी प्रयत्न केला नाही. असे काही स्वयंघोषित भावी आमदार सध्या अचानक प्रकट झाले आहेत व ते गल्ली बोळात फिरू लागले आहेत. यांची कोणाची ओळख नाही. तसेच कुणी यांना ओळखत ही नाही असे काही स्वयंघोषित नेते गावात डिजिटल बॅनर लावून, स्वतः पॉम्पलेट वाटून मीच भावी आमदार म्हणून जाहीर कार्यक्रमातून मिरवत आहेत. जनता या लोकांना चांगले ओळखून आहे. याबाबत भाजपाचे युवा कार्यकर्ते अक्षय भुमकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, मागील ३५ वर्षांपासून अधिक काळ मुंदडा कुटुंब हे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन व आपल्या परिवारातील एक भाग, घटक समजून यशस्वी वाटचाल करीत आहे. प्रत्येकाच्या सुख-दुःखात ते नेहमीच सहभागी होतात. प्रत्येकाच्या मदतीला धावून येतात. मागील काही महिन्यांपासून केज विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आ.नमिताताई यांनी भाजप वरीष्ठ नेतृत्वाच्या माध्यमातून करोडो रूपयांचा निधी मंजूर करून आणला. यातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे पूर्ण झाली. काही पुर्ण होत आहेत. दिवसेंदिवस भाजपा व आ.नमिताताई यांची केज विधानसभा मतदारसंघात वाढत असलेली लोकप्रियता व होत असलेली कोट्यावधी रूपयांची दर्जेदार कामे पाहून काही जणांना पोटशूळ उठले आहे. तेच लोक सोशल मीडियावरून रोज चुकीच्या पोस्ट टाकून विकास झाला नाही अशा स्वरूपाचा अपप्रचार व खोट्या अफवा पसरवित आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. खरी परिस्थिती व सत्य हे आहे की, आमच्या नेत्या केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली नियोजनबद्ध यंत्रणा राबविली जाते. ज्यातून गोरगरीब, गरजू, वंचित कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जातो. मुंदडा कुटुंबियांनी कधी ऊन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता, तसेच स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता अहोरात्र जनता, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी कायम जनसंपर्क व सुसंवाद ठेवतात. पक्षाच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवरून आलेल्या सर्व सुचनांचे योग्य रीतीने पालन करून पक्षाची ध्येयधोरणे राबवितात. भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन मुंदडा कुटुंबियांनी मागील अनेक वर्षांपासून अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आहे. त्यांच्या कामाविषयी एकाही कार्यकर्त्यांने या संदर्भात कधीच साधी वैयक्तिक तक्रार ही केलेली नाही हे विशेष होय. आमच्या नेत्या आमदार पंकजाताई मुंडे यांच्यासह पक्षाच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांचा विश्वास मुंदडा कुटुंबियांनी वेळोवेळी सार्थ ठरविला आहे. केज मतदारसंघामध्ये कोणताही विकास झाला नाही अशा खोट्या गोष्टी पेरल्याने विरोधकांना काहीच साध्य होणार नाही, मग हा बिनकामाचा उठाठेव कशासाठी असा परखड सवाल ही अक्षय भुमकर यांनी उपस्थित केला आहे.
ते कायमस्वरूपी भावीच राहतील : अक्षय भुमकर
काही ही माहिती नसताना केवळ हेव्यादाव्यापोटी व गैरसमजातून सोशल मीडियावरून बिनबुडाचे आरोप व अपप्रचार करून विरोधक रोजच जनतेची दिशाभूल करीत आहेत. आमदार होण्याची अनेकांना सुप्त इच्छा आहे. मागील अनेक वर्षांपासून जी माणसं कधीच कुठे दिसून आली नाहीत. कुणाच्या सुखदुःखात, सामाजिक प्रश्नांवर, आंदोलनात, मोर्चात साधे सहभागी ही झाले नाहीत, यांनी कुणाला कधी सढळ हस्ते मदत केल्याचे आपण पाहिले नाही, ज्यांना सामाजिक प्रश्नांची साधी जाण नाही असे काही स्वयंघोषित भावी आमदार सध्या पावसाळी छत्र्यांसारखे अचानक गल्ली बोळात प्रकट होवून फिरू लागले आहेत. या स्वयंघोषित भावी आमदारांची कोणाची प्रत्यक्ष ओळख ही नाही. तसेच कुणी यांना कधी पाहिले नाही, व ओळखत ही नाही असे काही स्वयंघोषित नेते आज गावात, चौकात स्वतःचे डिजिटल बॅनर लावून, पॉम्पलेट वाटून मीच उद्याचा भावी आमदार म्हणून मिरवत आहेत. बळेच लोकांना एकत्र जमवून फोटो सेशन करीत आहेत. कधी कुणाला साधे पाणी ही न विचारणारे थेट आग्रह करून चहा पाजत आहेत. त्यामुळे जनतेला या लोकांचा खरा हेतू समजत आहे. जनता यांना चांगलेच ओळखून आहे. कारण, भावी अनेक, प्रभावी मात्र एकच... त्या म्हणजे आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा या होय. त्यामुळे ते इच्छुक असणारे हे कायमस्वरूपी भावीच राहतील असे भाजपचे युवा कार्यकर्ते अक्षय भुमकर यांनी सांगितले आहे.
==================================
Comments
Post a Comment